Srinidhi Deccan Team Dainik Gomantak
क्रीडा

I-League Football Tournament: गोव्याच्या चर्चिल ब्रदर्सचा निसटता पराभव; श्रीनिदी डेक्कनने मारली बाजी!

किशोर पेटकर

I-League Football Tournament: आय-लीग फुटबॉल स्पर्धेत सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये गोल स्वीकारल्यामुळे गोव्याच्या चर्चिल ब्रदर्सला निसटता पराभव पत्करावा लागला. श्रीनिदी डेक्कन संघाने त्यांना 2-1 फरकाने नमवले. वास्को येथील टिळक मैदानावर हा सामना रंगला होता.

दरम्यान, एली साबिया याचा हेडर सामन्यात निर्णायक ठरला. त्याने 90+4 व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे श्रीनिदी डेक्कन गोलबरोबरीची कोंडी फोडत स्पर्धेतील सातव्या विजयाची नोंद केली. त्यांचे आता 12 लढतीतून 23 गुण झाले असून ते तिसऱ्या स्थानी आहेत. 11 व्या मिनिटास हुआन कास्तानेदा याच्या भेदक हेडिंग गोलमुळे श्रीनिदी डेक्कनने आघाडी घेतली. 88 व्या मिनिटास अल हादजी करीम सांब याच्या गोलमुळे चर्चिल ब्रदर्सने बरोबरी साधली. त्यानंतर इंज्युरी टाईममध्ये गोल स्वीकारल्यामुळे माजी आय-लीग विजेत्यांना बरोबरीचा एक गुण हुकला.

दुसरीकडे, आय-लीग विजेत्या चर्चिल ब्रदर्सला पाचवा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे 11 लढतीनंतर त्यांचे 12 गुण असून क्रमवारीत दहाव्या क्रमांक कायम आहे. त्यांचा स्पर्धेतील पुढील सामना 10 फेब्रुवारीला नामधारी स्पोर्टस क्लबविरुद्ध होईल.

स्पोर्टिंग गोवाने युनायटेडला नमवले

सामन्याच्या पूर्वार्धातील दोन गोलच्या बळावर आय-लीग 2 फुटबॉल स्पर्धेत स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने युनायटेड स्पोर्टस क्लबला 2-0 फरकाने नमवले. सामना रविवारी पश्चिम बंगालमधील कल्याणी येथे झाला. अलिस्टर अँथनी याने 33 व्या आणि बिस्वा दारजी याने 39 व्या मिनिटास केलेल्या प्रत्येकी एका गोलमुळे स्पोर्टिंग गोवाने दुसऱ्या विजयाची नोंद केली. त्यांचे आता दोन लढतीनंतर सात गुण झाले असून ते तिसऱ्या स्थानी आहेत. तिसऱ्या पराभवामुळे युनायटेड क्लबचे तीन गुण कायम राहिले. स्पोर्टिंग गोवाचा ज्योएल कुलासो सामन्याचा मानकरी ठरला. त्यांचा पुढील सामना 8 फेब्रुवारीला ऑरेंज एफसीविरुद्ध होईल.

तसेच, रविवारी स्पर्धेत झालेल्या अन्य लढतीत स्पोर्टिंग क्लब बंगळूरने एफसी बंगळुरु युनायटेडला 2-0 असे, तर ऑरेंज एफसीने केंकरे एफसीला 1-0 असे हरवले. पराभवानंतर बंगळुरु युनायटेड 4 सामन्यांतून 9 गुणांसह अव्वल राहिला. ऑरेंज एफसी सात गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. स्पोर्टिंग क्लब बंगळुरुचे सहा गुण झाले असून केंकरे एफसीचे तीन गुण कायम आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वेलिंगकरांच्या अटकेसाठी गोवा पोलिसांची महाराष्ट्रात शोध मोहीम!

खरी कुजबुज: जीत - मायकल आमने सामने

Saint Francis Xavier पवित्र दर्शनात भ्रष्टाचार; प्रकल्पांमधले पैशे खिशात, जनतेचे पैसे बरबाद केल्याचा भाजप सरकारवर आरोप

Bicholim News: भाडेकरूंची डिचोली पोलिस स्थानकात गर्दी! कार्यक्षेत्रात तपासणी मोहिमेला वेग

'गोवा पोलिस' अंमलीपदार्थांविरोधी गंभीर! 'कोकेन जप्ती'प्रकरणी दिल्ली पोलिसांना करणार सहकार्य

SCROLL FOR NEXT