Sri Lanka Dainik Gomantak
क्रीडा

IND Vs SL: श्रीलंकेचा भारतावर निसटता विजय

Asia Cup 2022: आशिया चषक 2022 मध्ये भारत आणि श्रीलंकेचे संघ प्रथमच आमनेसामने आले होते.

दैनिक गोमन्तक

Asia Cup 2022: आशिया चषक 2022 मध्ये भारत आणि श्रीलंकेचे संघ प्रथमच आमनेसामने आले होते. आशिया चषक 2022 च्या फायनलमध्ये जाण्यासाठी टीम इंडियाला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागणार होता. यातच श्रीलंकेने सुपर 4 मधील पहिला सामना जिंकला होता. याच यशाची पुनरावृत्ती करत श्रीलंकेने सलग दुसरा विजय मिळवून अंतिम फेरीतील आपला दावा मजबूत केला. सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानचा पराभव केला होता, तर टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते.

दरम्यान, भारत आणि श्रीलंका यांच्यातील आशिया कप 2022 सुपर-4 चा तिसरा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट टीम स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेत भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावत 173 धावा केल्या. तर श्रीलंकेसमोर विजयासाठी 174 धावांचे लक्ष्य होते.

दुसरीकडे, 13 च्या स्कोअरवर टीम इंडियाचे (Team India) दोन गडी बाद झाले होते. केएल राहुल (KL Rahul) सहा धावा करुन बाद झाला तर विराट कोहलीही खाते न उघडताच बाद झाला. त्यानंतर कर्णधार रोहितसह सूर्यकुमारने तिसऱ्या विकेटसाठी 58 चेंडूत 97 धावांची भागीदारी करत भारताला मजबूत स्थितीत आणले. रोहित 72 धावा करुन बाद झाला. त्याने 41 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकार ठोकले. तो बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवही (Suryakumar Yadav) 34 धावा करुन बाद झाला. 19 व्या षटकात भारताने दोन चेंडूंत सलग दोन विकेट गमावल्या. दीपक हुड्डापाठोपाठ पंतही 17 धावा करुन बाद झाला. शेवटी रविचंद्रन अश्विनने सात चेंडूत एका षटकाराच्या मदतीने 15 धावांची मौल्यवान खेळी केली.

केएल राहुल आणि विराट कोहली स्वस्तात बाद झाले

पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-4 च्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाच्या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी करुन दमदार सुरुवात केली. मात्र दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने तीन षटकांतच आपल्या दोन बड्या खेळाडूंचे विकेट गमावले. केएल राहुलने 7 चेंडूत केवळ 6 धावा केल्या. त्याचवेळी आशिया चषक स्पर्धेत दोन अर्धशतके झळकावणारा विराट कोहली या महत्त्वाच्या सामन्यात 4 चेंडूत धावा न करता पॅव्हेलियनमध्ये परतला. हे दोघे लवकर बाद झाल्यामुळे भारतीय संघ दडपणाखाली पोहोचला होता, त्यामुळे संघाला सावरायला वेळ लागला.

मिडल ऑर्डर फ्लॉप

खराब सुरुवातीनंतर सूर्यकुमार यादव आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 58 चेंडूत 97 धावांची भागीदारी झाली. मात्र यादरम्यान भारताने रोहितची विकेट गमावली. रोहित 41 चेंडूत 72 धावा करुन बाद झाला. यानंतर सूर्यकुमारही 34 धावांवर बाद झाला. हे दोघे बाद झाल्यानंतर पंत आणि पंड्या यांच्यात पाचव्या विकेटसाठी 19 चेंडूत 30 धावांची भागीदारी झाली, मात्र एकाही खेळाडूला वेगाने धावा करता आल्या नाहीत. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ऋषभ पंत, हार्दिक पंड्या आणि दीपक हुडा यांनी विकेट गमावल्या.

पॉवरप्लेमध्ये भारतीय गोलंदाजांची खराब कामगिरी

श्रीलंकेला 174 धावांचे लक्ष्य गाठण्यापासून रोखण्यासाठी भारतीय गोलंदाजांवर सुरुवातीला विकेट्स घेण्याचे दडपण होते. पण भुवनेश्वर, अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्या आणि यजुवेंद्र चहल यांना पॉवरप्ले ओव्हर्समध्ये श्रीलंकेच्या एकाही फलंदाजाला बाद करता आले नाही. डावाच्या 12 व्या षटकात भारताला लागोपाठ दोन विकेट मिळाल्या, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. यादरम्यान भारतीय गोलंदाजही महागडे ठरले आणि पॉवरप्लेमध्ये 57 धावा दिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

SCROLL FOR NEXT