Danushka Gunathilaka Dainik Gomantak
क्रीडा

Danushka Gunathilaka: ऑस्ट्रेलियातील लैंगिक अत्याचार प्रकरण; श्रीलंकन क्रिकेटपटूची निर्दोष मुक्तता

Danushka Gunathilaka: श्रीलंकेच्या क्रिकेटपटूवर गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियात लैंगिक अत्याचाराचा आरोप करण्यात आलेला, ज्यातून त्याला निर्दोष ठरवण्यात आले आहे.

Pranali Kodre

Sri Lanka cricketer Danushka Gunathilaka found not guilty in sexual assault trial at Australia:

श्रीलंकेचा 32 वर्षीय क्रिकेटपटू दनुष्का गुणथिलका गेल्या काही महिन्यांपासून अडचणीत सापडला होता. मात्र, आता त्याला दिलासा मिळाला आहे. गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी20 वर्ल्डकप दरम्यान त्याच्यावर एक महिलेवर लैंगिक अत्याचार करण्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, आता त्याला या आरोपात निर्दोष ठरवण्यात आले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार सिडनी डावनिंग सेंटर जिल्ह्यातील न्यायालयाने चार दिवसांच्या सुनावणीनंतर हा निर्णय दिला आहे. दरम्यान, टी20 वर्ल्डकप 2022 स्पर्धेवेळी श्रीलंका संघ मायदेशात परतण्याच्या काही तास आधी गुणथिलकाला ऑस्ट्रेलियात अटक करण्यात आली होती.

त्याच्यावर महिलेवर लैंगिक अत्याचार करण्याचा आरोप करण्यात आला होता. महिलेने त्याच्यावर संताप, हिंसा, चूकिच्या जागी चापटी मारणे, बळजबरीने किस करणे आणि श्वास घेण्यापासून रोखण्याचा प्रयत्न असे आरोप केले होते. दरम्यान, त्याच्यावरील चार आरोपांपैकी तीन आरोप नाकारण्यात आले असून केवळ चोरीचा एकच आरोप कायम करण्यात आला आहे.

अनेक रिपोर्ट्सनुसार त्याची आणि आरोप करणाऱ्या महिलेची एका डेटिंह ऍपवर ओळख झाल्याचे समजत आहे. त्यानंतर त्यांच्यात भेटीगाठी झाल्या होत्या.

इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार न्यायाधीश साराह हगेट यांनी सांगितले की तक्रारीबद्दलचे पुरावे तक्रारदाराचे समर्थन न करता उलट त्या पुराव्यांच्या विश्वसनीयतेला अधिक धक्का देत आहे.

तसेच न्यायाधिशांनी सांगितले की 'पुराव्यांवरून असे दिसते की आरोपीला कंडोम काढण्याची संधी नव्हती, कारण संभोग सतत सुरू होता.' त्याचबरोबर त्यांनी सांगितले की क्रिकेटपटूने त्याला विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे पोलिसांना दिली आहेत. तो स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी सर्व प्रयत्न करत असल्याचे दिसत होते.

हगेट यांनी सांगितल्यानुसार 'त्याने मुलाखतीदरम्यान जे सांगितले आहे, त्याला नाकारण्याचे कारण नाही. साक्षीदार जाणीवपूर्वक खोटे पुरावे देण्याच्या इच्छेने का प्रेरित होते, मला कळाले नाही. तथापि, असे काही प्रसंग होते, जिथे असे वाटले की तिचे काही पुरावे खेळाडूला बदनाम करण्याच्या हेतूने सादर झाले.'

दरम्यान, गुणतालिकाला जामीन मिळालेली होती, मात्र संपूर्ण सुनावणीदरम्यान, त्याला श्रीलंकेला परत जाण्यावर बंदी घालण्यात आली होती. तसेच त्याच्या अटकेपासून त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यापासून बंदी घालण्यात आलेली.

दरम्यान, आता तो परत श्रीलंकाल परतू शकतो. त्याने याबद्दल आनंद व्यक्त करताना म्हटले आहे की न्यायाधीशांनी दिलेला निर्णय सर्वकाही सांगून जात असून तो पुन्हा त्याचे आयुष्य पूर्वीसारखे जगण्यासाठी आणि क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक आहे.

त्याने आत्तापर्यंत 8 कसोटी, 47 वनडे आणि 46 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

SCROLL FOR NEXT