श्रीसंतने (Sreesanth) मौन सोडले आहे तो दोन वेळचा विश्वचषक विजेता म्हणाला, मी फक्त 10 लाख रुपयांसाठी अशाप्रकारची गोष्ट का करेन. Dainik Gomantak
क्रीडा

Spot Fixing प्रकरणाबाबत श्रीसंतने सोडले मौन

दैनिक गोमन्तक

कोची: स्पॉट फिक्सिंग (Spot Fixing) प्रकरामुळे अनेक वर्षे क्रिकेट (Cricket) पसून दूर झालेला भारताचा (India) माजी वेगवान गोलंदाज श्रीसंतने (Bowler Sreesanth) या प्रकरणात काय घडले ते स्पष्ट केले आहे. 2013 मध्ये, श्रीसंतसह राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) दोन क्रिकेटपटूंवर स्पॉट फिक्सिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यावर आता श्रीसंतने मौन सोडले आहे तो दोन वेळचा विश्वचषक विजेता म्हणाला, मी फक्त 10 लाख रुपयांसाठी अशाप्रकारची गोष्ट का करेन.

तो म्हणाला, 'मी इराणी करंडक खेळलो होतो आणि दक्षिण आफ्रिके विरुध्दची मालिका खेळण्याचा विचार करत होतो. सप्टेंबर 2013 मध्ये होणाऱ्या अफ्रिके विरुध्दच्या मालिकेसाठी आम्ही तेथे लवकर गेलो कारण या तेथे आम्हाल चांगला खेळ करायचा होता. ती मालिका खेळणे हेच माझे ध्येय होते. 10 लाखांसाठी मी असे का करू ? कारण त्यावेळी मला जवळपास 2 लाखांची बिलेच येत होती. परंतु या सगळ्यातून मला माझ्या चाहत्यांनी आणि हितचिंतकांनीच त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यास खूप मदत केली.

मी माझ्या आयुष्यात, फक्त लोकांना मदतच केली असून त्यांचा विश्वास कमविला आहे. त्यांनी केलेल्या प्रार्थनांमुळे मला यातून बाहेर पडण्यास मदत झाली आहे. आपल्या पायाच्या बोटाला 12 दुखापती झाल्या असताना देखील 130-प्लस गोलंदाजी करत असल्याचा दावा केला आहे. तसेच एका सामन्यात एका ओव्हरमध्ये 14-प्लस धावा हव्या असताना मी चार चेंडूत पाच धावा दिल्या. आयपीएलमध्ये देखील एकही नो-बॉल, वाईड बॉलवर धाव दिलेली नाही.

श्रीसंतवरील खेळण्याची बंदी उठवल्यानंतर, हा अनुभवी वेगवान गोलंदाज या वर्षाच्या सुरुवातीला सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

SCROLL FOR NEXT