Dainik Gomantak
Dainik Gomantak
क्रीडा

I-League Football: श्रीनिदी डेक्कनची चर्चिल ब्रदर्सवर तीन गोलने सहज मात

किशोर पेटकर

I-League Football: श्रीनिदी डेक्कनने चर्चिल ब्रदर्सवर 3-0 फरकाने मात करून आय-लीग फुटबॉल स्पर्धेत अव्वल स्थान मिळविले. हैदराबाद येथील डेक्कन अरेनावर शनिवारी झालेल्या लढतीतील सर्व गोल उत्तरार्धातील खेळात झाले.

डेव्हिड कास्तानेदा मुनोझ याने 55व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर पहिला गोल केला. संघाच्या कर्णधाराचा हा यावेळच्या आय-लीग स्पर्धेतील वैयक्तिक 13वा गोल ठरला.

यावेळी गोलक्षेत्रात चेंडू चर्चिल ब्रदर्सच्या जोसेफ क्लेमेंत याच्या हाताला लागल्यामुळे यजमान संघाला पेनल्टी फटक्याचा लाभ मिळाला. नंतर बदली खेळाडू राम्हलुनछुंगा याने 70व्या मिनिटास तर आणखी एक बदली खेळाडू लुईस ओगाना याने मैदानावर आल्यानंतर लगेच 90+3व्या मिनिटास गोल नोंदवून हैदराबादमधील संघाच्या एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब केले.

उत्तरार्धात श्रीनिदी डेक्कनचा गोलरक्षक उबेद याची कामगिरीही निर्णायक ठरली. त्याने चर्चिल ब्रदर्सच्या अब्दौलाये साने याचे दोन फटके, तसेच इमॅन्युएल याघ्र याचा प्रयत्नही उधळून लावला.

सलग दुसऱ्या विजयाची नोंद

श्रीनिदी डेक्कनचा हा चर्चिल ब्रदर्सवरील सलग दुसरा विजय ठरला. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातही त्यांनी गोव्यातील संघाला 3-2 फरकाने पराभूत केले होते. गतमोसमातही हैदराबादच्या संघाने चर्चिल ब्रदर्सला नमविले होते.

श्रीनिदी डेक्कनचा हा यंदा स्पर्धेतील दहावा विजय ठरला. त्यांचे आता 15 लढतीनंतर 31 गुण झाले आहेत. त्यामुळे 30 गुणांसह पंजाब एफसीला दुसऱ्या स्थानी घसरावे लागले. चार लढतीत अपराजित (2 विजय, 2 बरोबरी) राहिल्यानंतर चर्चिल ब्रदर्स संघ पराभूत झाला.

त्यांचा हा एकंदरीत पाचवा पराभव ठरला. त्यामुळे माजी विजेता संघ 15 लढतीनंतर 20 गुणांसह पाचव्या स्थानी कायम राहिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

‘’दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटी अन् सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तितकेच जबाबदार’’, पतंजली प्रकरणात SC ची कठोर टिप्पणी

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

High Court Order: वृद्ध सासूसोबत राहण्यास पत्नीचा नकार; उच्च न्यायालयाने दिला घटस्फोटाचा आदेश

SCROLL FOR NEXT