Sreenidi Deccan Dainik Gomantak
क्रीडा

I-League Football: 'चर्चिल ब्रदर्स'ला नमवत 'श्रीनिदी डेक्कन'ची विजयी सलामी

आय-लीग फुटबॉल सामन्यात श्रीनिदी डेक्कनचा 3-2 फरकाने विजय

दैनिक गोमन्तक

पणजी: चर्चिल ब्रदर्सने तीन गोलने मागे पडल्यानंतर सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात झुंजार प्रयत्न केले, पण त्यांना दोनच गोल नोंदवता आले. परिणामी आय-लीग फुटबॉल स्पर्धेत श्रीनिदी डेक्कन एफसीने विजयाचे पूर्ण तीन गुण प्राप्त केले.

(Sreenidi Deccan FC team defeated Churchill Brothers team in I-League football tournament)

बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियमवर आज ( रविवारी ) झालेल्या लढतीत श्रीनिदी डेक्कनने 3-2 फरकाने बाजी मारली. त्यांचा या स्पर्धेतील पहिला विजय ठरला, त्यामुळे त्यांचे दोन लढतीनंतर तीन गुण झाले. चर्चिल ब्रदर्सला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. गतआठवड्यात त्यांना बांबोळी येथील राजस्थान युनायटेडने नमविले होते.

श्रीनिदी डेक्कनला 25 व्या मिनिटास आघाडी मिळाली. सोंगपू सिंगसिट याचा फटका चर्चिल ब्रदर्सचा बचावपटू राजू गायकवाड याला चाटून गोलनेटमध्ये गेला. 40 व्या मिनिटास नायजेरियन लुईस ओगाना याने केलेल्या गोलमुळे पाहुणा संघ विश्रांतीला 2-0 असा आघाडीवर होता. नंतर 67 व्या मिनिटास कोलंबियन डेव्हिड मुनोझ याच्या गोलमुळे श्रीनिदी डेक्कनच्या खाती 3-0 अशी भक्कम आघाडी जमा झाली. त्यानंतर चर्चिल ब्रदर्सने आक्रमण तेज केले.

69 व्या मिनिटास रिचर्ड कॉस्ता याने माजी विजेत्यांची पिछाडी एका गोलने कमी केली. 75 व्या मिनिटास बदली खेळाडू लालखॉपुईमाविया याच्या गोलमुळे चर्चिल ब्रदर्सची पिछाडी 2-3 अशी कमी झाली, त्यामुळे त्यांना बरोबरीची संधी दिसू लागली, मात्र पाहुण्या संघाने आघाडी अबाधित राखण्यास यश मिळविले.

पंजाब एफसी विजयी

पंचकुला येथे झालेल्या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात पंजाब एफसीने मोहम्मेडन स्पोर्टिंगला 1-0 फरकाने हरविले. लुका मासेन याने तिसऱ्याच मिनिटास केलेल्या गोलमुळे पंजाबने स्पर्धेतील सलग दुसरा सामना जिंकला. मोहम्मेडन स्पोर्टिंगला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT