Squash ball, gloves and Adam Gilchrist... the story of a World Cup final villain:
गोष्ट आहे २८ एप्रिल 2007 ची. या दिवशी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होता. तो दिवस गाजवला तो फक्त स्क्वॅश बॉल, ग्लोव्ज आणि ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर अॅडम गिलख्रिस्टने.
16 वर्षांपूर्वी कांगारू संघाने एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याची हॅट्ट्रिक केली होती. तेव्हा अंतिम सामन्यात समोर होता श्रीलंकेचा संघ आणि मैदान होते किंग्स्टन ओव्हल, बार्बाडोस, वेस्ट इंडिज.
२००३ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना खेळलेली टीम इंडिया २००७ च्या स्पर्धेच्या पहिल्या फेरीतच पाकिस्तानसह बाहेर पडली होती. तर ऑस्ट्रेलियन संघाने तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली होती.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावत 281 धावा केल्या. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात श्रीलंकेचा संघ 36 षटकात 8 विकेट गमावत केवळ 215 धावाच करू शकला आणि 53 धावांनी विजेतेपद गमावले.
आतापर्यंत तुम्हा आम्ही काय सांगतोय याची कल्पना आली असेल. पण खरी गोष्ट अशी आहे की, या सामन्याचा नायक नंतर चाहत्यांमध्ये खलनायक बनला. हिरो होता ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज अॅडम गिलख्रिस्ट.
या सामन्यात गिलख्रिस्टने 149 धावांची खेळी खेळली. त्याने शतक झळकावताच त्याचे सर्वत्र कौतुक होत होते, मात्र जेव्हा त्याने हात उंचावून आपली बॅट आणि ग्लव्ह्ज दाखवले आणि सुरू झाला सर्वात मोठा वाद.
वास्तविक, गिलख्रिस्टच्या एका ग्लव्ह्जमध्ये काहीतरी गोलाकार वस्तू दिसत होती. कॅमेऱ्यांसह मैदानात उपस्थित क्रिकेट चाहते आणि श्रीलंकेच्या खेळाडूंनीही हे पाहिले.
यानंतर गिलख्रिस्टवर अप्रामाणिकतेचा डाग पडला. आपल्या मॅच-विनिंग इनिंगनंतर आणि विजेतेपद जिंकल्यानंतर, गिलख्रिस्टने सांगितले होते की, त्याने आपल्या ग्लोव्हजमध्ये स्क्वॅश बॉल लपवला होता. त्यामुळे बॅटची पकड मजबूत झाली. क्रिकेटमध्ये हे काही नवीन तंत्र नाही. होय, परंतु आतापर्यंत ते कोणीच वापरले नव्हते.
गिलख्रिस्टला त्याचे फलंदाजी प्रशिक्षक बॉब मुलोमन यांनी ही युक्ती शिकवल्याचेही नंतर समोर आले. या संपूर्ण घटनेनंतर बॉब म्हणाले होते की, मी गिलीसोबत 12-13 वर्षे स्क्वॅश बॉलचा सराव केला होता. पण त्याचा वापर त्याने 2007 च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात केला.
अंतिम फेरी संपली, कांगारू संघाने विजेतेपदावर कब्जा केला. गिलख्रिस्ट नायकाचा खलनायक बनला. दरम्यान, श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या संपूर्ण प्रकरणाची तक्रार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) केली.
तेव्हा श्रीलंका बोर्डाने गिलख्रिस्टने क्रिकेट खेळाची परंपरा आणि भावना दुखावल्याचे म्हटले होते. त्यानंतर याला प्रत्युत्तर देताना, मेरीलेबोन क्रिकेट क्लब (MCC), क्रिकेटचे नियम बनवणारी संस्था, तक्रार खोटी असल्याचे म्हटले आहे, कारण अशी घटना टाळण्यासाठी क्रिकेटच्या नियमांमध्ये कोणतीही तरतूद नव्हती. अशा स्थितीत गिलख्रिस्टला बेईमान म्हणणेही चुकीचे मानले गेले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.