Ashutosh Masgaunde
वेस्ट इंडिजच्या या दिग्गजाने 132 कसोटी सामन्यांमध्ये 11953 धावा आणि 299 एकदिवसीय सामन्यांमध्ये 10405 धावा केल्या आहेत.
सौरव गांगुली हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. या डावखुऱ्या फलंदाजाने अनेकवेळा अविस्मरणीय खेळ्या करत चाहत्यांचे मन जिंकले आहे.
सर गॅरी सोबर्स हे वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू आहेत. त्यांनी क्रिकेटमध्ये दिलेल्या अमुल्य योगदानासाठी त्यांना 'सर' ही पदवी बहाल करण्यात आली आहे.
अॅडम गिलख्रिस्ट हा ऑस्ट्रेलियाचा निवृत्त डावखुरा फलंदाज आहे. गिलख्रिस्टला आतापर्यंतचा महान यष्टिरक्षक म्हणून ओळखले जाते.
कुमार संगकारा हा एक श्रीलंकेचा माजी यष्टीरक्षक आणि फलंदाज होता. जगातील महान क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून त्याची ओळख आहे.
श्रीलंकाचा माजी सलामीवीर सनथ जयसूर्याने आपल्या आक्रमक खेळीने अनेकवेळा गोलंदाजांना झोडपून काढले आहे.
मॅथ्यू हेडनने 103 आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांतील 184 डावांमध्ये एकूण 8625 धावा केल्या आहेत. या कामगिरीत 30 शतके आणि 29 अर्धशतकांचा समावेश आहे.