'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

First Edition of Heritage First Festival: हेरिटेज फर्स्ट फेस्टिवलच्या प्रथम आवृत्तीत ३२ पदभ्रमण कार्यक्रमांची तसेच कार्यशाळांची मालिका आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमांमधून गोव्यातील नैसर्गिक आणि मानवनिर्मित वारसा स्थळांवर माहितीपूर्ण प्रकाश टाकला जाईल.
Heritage First Festival
Heritage First Festival 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Heritage First Festival 2024

'हेरिटेज फर्स्ट फेस्टिवल’ची पहिली आवृत्ती गोव्यात १५ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या महोत्सवात २७ ‘पायलट’ ( तज्ज्ञ क्युरेटर), या राज्याबद्दल विशेष ज्ञान मिळवण्यास उत्सुक असलेल्यांना, माहितीपूर्ण पदभ्रमणात मार्गदर्शन करतील.‌

गोव्यातील प्रसिद्ध मोटरसायकल पायलटवर आधारून क्युरेटरचे नामानिधान ‘पायलट’ असे करण्यात आले आहे. गोव्याच्या या मोटरसायकल पायलटना राज्यातील महत्त्वाच्या जागा तसेच ग्रामीण भागातील वैशिष्ट्यपूर्ण खुणांची बरीच माहिती असते. ‘हेरिटेज फर्स्ट’च्या आयोजकांकडून गोव्यातील भाड्याच्या मोटरसायकल  व्यवसायाला दिली गेलेली एक प्रकारे मानवंदना आहे. 

हेरिटेज फर्स्ट फेस्टिवलच्या प्रथम आवृत्तीत ३२ पदभ्रमण कार्यक्रमांची तसेच कार्यशाळांची मालिका आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमांमधून गोव्यातील नैसर्गिक आणि मानवनिर्मित वारसा स्थळांवर माहितीपूर्ण प्रकाश टाकला जाईल. हा महोत्सवच मुळात गोव्याच्या वारशाचे संवर्धन व्हावे, ते सर्वांसाठी खुले असावे आणि त्याच्याशी सर्वांचे नाते जुळावे या उद्देशांना समर्पित आहे.

या महोत्सवातील कार्यक्रमांमधून गोव्याची जैवविविधता, स्थानिक बाजारपेठा, स्थानिक हंगामी उत्पादने, पारंपारिक कला, संगीत आणि हस्तकला प्रकार, गोव्यातील बेटे आणि शहरे याबद्दल सखोल माहिती महोत्सवात सहभागी होणाऱ्यांना मिळेल.

‘हेरिटेज फर्स्ट गोवा’च्या हेता पंडित सांगतात, ‘या महोत्सवाच्या पदभ्रमणांमधून, ज्या जागेवर आम्ही पूर्वी असंख्य वेळा फिरलो असू त्या जागांबद्दल आपल्या मनात एक नवीन कौतुक निश्चितच निर्माण होईल. त्यातील अनेक जागा आपल्याला सुपरीचीत असतील परंतु आम्ही त्यांच्याकडे अधिक माहिती करून घेण्याच्या आणि स्वतःला त्याबद्दल अधिक शिक्षित करून घेण्याच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत.

’ हेरिटेज फर्स्ट महोत्सवाचे कार्यक्रम चार श्रेणीत विभागलेले आहेत - १.अंगभूत वारसा, २. निसर्ग आणि जैवविविधता, ३. कला आणि हस्तकला, ४. कार्यशाळा. या महोत्सवातील कार्यक्रमांचे संचालन करणारे तज्ज्ञ अनेक वर्षांच्या संशोधनातून मिळवलेले गोव्याबद्दलचे आपले समृद्ध अनुभव उपस्थितांसमोर मांडतील. उत्तरेतील मोरजी ते दक्षिणेतील राशोल गाव हे क्षेत्र या महोत्सवाचा भाग असणार आहे.

Heritage First Festival
Russian Dj Arrested: धक्कादायक! गोव्यात पहिल्यांदाच GHB Drugs जप्त, रशियन Dj महिलेला अटक

या क्षेत्रात होणारे प्रत्येक पदभ्रमण आणि त्यासंबंधीच्या कार्यशाळा शक्य तितक्या परस्परसंवादी व्हाव्यात हा या महोत्सवाचा हेतू आहे. हेरिटेज फर्स्टच्या पदभ्रमणात किंवा कार्यशाळेत सामील होण्यासाठी आपण https://heritagefirstgoa.explara.com/events या संकेतस्थळांवर जाऊन त्याबद्दल अधिक माहिती मिळवू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com