क्रीडामंत्री मनोहर (बाबू) आजगावकर यांना निवेदन सादर करताना गोवा ऑलिंपिक असोसिएशनचे उपाध्यक्ष राजू मंगेशकर, सोबत शिष्टमंडळातील इतर सदस्य  Dainik Gomantak
क्रीडा

Goa: इनडोअर क्रीडा संकुले खुली करण्यास क्रीडामंत्री अनुकूल

कोविड-19 (covid19) निर्बंधामुळे बंद असलेले इनडोअर क्रीडा संकुले क्रीडापटूंसाठी लवकरच खुली करण्यास क्रीडामंत्री मनोहर (बाबू) आजगावकर (Manohar Ajgaonkar) यांनी अनुकूलता दर्शविली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी - कोविड-19 (covid19) निर्बंधामुळे बंद असलेले इनडोअर क्रीडा संकुले क्रीडापटूंसाठी लवकरच खुली करण्यास क्रीडामंत्री मनोहर (बाबू) आजगावकर (Manohar Ajgaonkar) यांनी अनुकूलता दर्शविली आहे. यासंदर्भात गोवा ऑलिंपिक असोसिएशनच्या (GOA) शिष्टमंडळाने शुक्रवारी क्रीडामंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.(Sports Minister favors opening of indoor sports complexes)

"इतर राज्यांनी इनडोअर क्रीडा सुविधा खेळाडूंसाठी खुली केली आहेत. गोवा सरकारनेही आता निर्बंध उठविणे आवश्यक आहे. खेळाडूंना लवकरच सरावासाठी परवानगी देणे आवश्यक आहे. यासंदर्भात मी निश्चितच मुख्यमंत्र्यांशी बोलेन आणि इनडोअर क्रीडा प्रकल्प पुढील आठवड्यापासून सुरू करण्यासंदर्भात विनंती करेन," असे आश्वासन क्रीडामंत्री आजगावकर यांनी शिष्टमंडळास दिले. यावेळी क्रीडामंत्र्यांच्या पर्वरी येथील कार्यालयात गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक वसंत प्रभुदेसाई (Vasant Prabhudesai) यांचीही उपस्थिती होती. त्यांनीही क्रीडामंत्र्यांच्या वक्तव्याशी सहमती दर्शविली.

जीओए शिष्टमंडळात सचिव गुरुदत्त भक्ता, उपाध्यक्ष राजू मंगेशकर, तसेच संदीप हेबळे, राजेंद्र गुदिन्हो, निशा मडगावकर, हेमांग दोशी यांचा समावेश होता. यावेळी शिष्टमंडळाने क्रीडामंत्र्यांशी विविध विषयावर चर्चाही केली. अर्धवट स्थितीत असलेले कांपाल येथील तरण तलाव प्रकल्प, राज्यस्तरीय क्रीडा संघटनांचे आणि क्रीडापटूंचे प्रलंबित असलेले अनुदान, पेडे-म्हापसा व चिखली-वास्को येथील इनडोअर स्टेडियमचे दुरुस्ती काम, शिवाय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजनासंदर्भात शिष्टमंडळाने क्रीडामंत्र्यांचे लक्ष वेधले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session:राज्यात अनेक घर फोड्या करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केलेल्या आरोपीला अटक

Goa Assembly: परराज्यातील दुचाकींची राज्यात नोंदणी व्हावी! दिलायला लोबोंची मागणी; टॅक्सी व्यवसाय संरक्षित करा असे आवाहन

GIDC:‘आयडीसी’च्या संचालकांवर गुन्हे नोंदवा! फेरेरांची मागणी; वित्तीय शिस्त न पाळल्याचा ठेवला ठपका

Ferry Boat Repair: फेरीबोटींवर 35 कोटींपेक्षा अधिक खर्च! आकडेवारीत विसंगती असल्याचा दावा; युरी-फळदेसाई यांच्यात जुंपली

Goa Politics: खरी कुजबुज; गोव्यातील ठेकेदार सुटले कसे?

SCROLL FOR NEXT