Goa Cricket Association (GCA) Indoor Academy, at Porvorim, On Saturday, 17 July, 2021 (Sports)  Dainik Gomantak
क्रीडा

Sports: गोवा महिला क्रिकेट संघाची मोहीम सप्टेंबरपासून सुरु

गतमोसमात (Last Season) शीखा पांडेच्या (Shikha Pandey) नेतृत्वाखाली जयपूर (Jaipur) येथे झालेल्या ५ सामन्यांच्या (One Day International) स्पर्धेत गोवा संघ (Goa Women's Cricket) जिंकला होता. (Sports)

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्याच्या सीनियर महिला क्रिकेट (Goa Women's Cricket) संघाची देशांतर्गत मोसमातील पहिली क्रिकेट स्पर्धा (Domestic Cricket) सप्टेंबरमध्ये होईल. त्यानिमित्त गोवा क्रिकेट असोसिएशनने (GCA) शिबिर प्रक्रिया सोमवारपासून सुरू करण्याचे ठरविले आहे. दीर्घ कालावधी नंतर मैदानात उतरणाऱ्या गोव्याच्या संघासमोर खडतर आव्हान असेल. (Sports) वरिष्ठ महिला क्रिकेट संघ प्रशिक्षकपदी (Cricket coach) सांगलीचे अनंत तांबवेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गोव्यातील महिला क्रिकेटशी दीर्घकाळ संबंधित असलेल्या अनुराधा रेडकर सहाय्यक प्रशिक्षक (Asst. Coach) आहेत. गतमोसमात कोरोना महामारीमुळे (Covid Pandemic) महिला गटात फक्त एकच स्पर्धा झाली होती. यावर्षी मार्च महिन्यात जयपूर (Jaipur) येथे गोव्याचा संघ कसोटीपटू (Test Player) शिखा पांडे (Shikha Pandey) हिच्या नेतृत्वाखाली (Captaincy) एकदिवसीय क्रिकेट (ODI Cricket) स्पर्धेत पाच सामने खेळला होता, त्यापैकी गोवा संघाने (Goa Cricket Team) तीन सामने जिंकले होते (Win) व दोन सामने गमावले होते. स्पर्धेची बाद फेरी गोव्याला थोडक्यात हुकली होती. तेव्हा अनुराधा संघाच्या प्रशिक्षक होत्या.

Sports: Shikha Pandey Goa Women's Cricket Captain

जीसीए अकादमीच्या इनडोअर संकुलात नेट सरावासाठी 29 महिला क्रिकेटपटूंची निवड

सुमारे चार महिन्यानंतर गोव्याच्या महिला क्रिकेटपटू सोमवारी पर्वरी येथील जीसीए अकादमीच्या इनडोअर संकुलात नेट सरावासाठी जमा होतील. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्बंध आल्याने क्रिकेटपटूंना सराव दुर्लभ झाला होता. जीसीएने महिला क्रिकेटपटूंचे ऑनलाईन तंदुरुस्ती शिबिर यापूर्वीच सुरू केले आहे. या शिबिरासाठी एकूण 29 जणींची निवड करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) नियोजित वेळापत्रकानुसार वरिष्ठ महिला एकदिवसीय (वन-डे) क्रिकेट स्पर्धा येत्या 21 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर या कालावधीत खेळली जाईल. गोव्याचा संघ एलिट गटात आहे, सध्याच्या वेळापत्रकानुसार त्यांना गटसाखळीत आठ सामने खेळावे लागतील. टी-२० स्पर्धा पुढील वर्षी मार्चमध्ये घेतली जाईल.

युवा प्रशिक्षक अनंत तांबवेकर यांची दुसऱ्यांदा प्रशिक्षकपदी नियुक्ती

सांगली येथील युवा प्रशिक्षक अनंत तांबवेकर यांची दुसऱ्यांदा गोव्याच्या सीनियर महिला क्रिकेट संघ प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली आहे. भारताची स्टार महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना हिचे आरंभापासून प्रशिक्षक असलेले अनंत यापूर्वी 2019-20 मोसमात गोव्याचे प्रशिक्षक होते. गोवा महिला क्रिकेटशी यापूर्वी संबंधित असल्याने येथील खेळाडूंची शैली अवगत असल्याचे 34 वर्षीय तांबवेकर यांनी नमूद केले. 2019-20 मोसमात ते प्रशिक्षक असताना गोव्याच्या सीनियर महिला संघाने टी-20 स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT