Trending Sports Events 2023
Trending Sports Events 2023 X
क्रीडा

Year Ending: वर्ल्डकप ते एशियन गेम्स, या स्पर्धा 2023 मध्ये भारतात झाल्या सर्वाधिक ट्रेंड

Pranali Kodre

Sports events trending in 2023 on Google:

वर्ष 2023 मधील आता अखेरचे काही दिवस शिल्लक आहेत. या वर्ष क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वाचे ठरले. या वर्षभरात अनेक महत्त्वाच्या स्पर्धा खेळवण्यात आल्या. दरम्यान या वर्षभरात काही स्पर्धा झाल्या, ज्यांची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. अशाच 5 क्रीडा स्पर्धांबद्दल जाणून घेऊ, ज्या गुगलवर भारतामध्ये सर्वाधिक ट्रेंड झाल्या.

5. आशियाई क्रीडा स्पर्धा

चीनमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये 19 वी आशियाई क्रीडा स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा भारतासाठी ऐतिहासिक ठरली. भारताने पहिल्यांदाच आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात 100 हून अधिक पदके जिंकली आहेत. भारताने 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 107 पदके जिंकली आहेत. यामध्ये 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 41 कांस्य पदकांचा समावेश आहे.

ही पदके मिळवताना अनेक विक्रमही रचले गेले आणि अनेक खेळाडूंना पुढील वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकची पात्रताही मिळाली. भारत पदक तालिकेत चौथ्या क्रमांकावर राहिला.

4. वूमन्स प्रीमियर लीग

यावर्षी आयपीएलच्या धर्तीवर पहिल्यांदाच वूमन्स प्रीमियर लीग (WPL) खेळवण्यात आली. या स्पर्धेलाही मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. पहिल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, गुजरात जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि युपी वॉरियर्स हे पाच संघ सहभागी झाले होते.

पहिल्या हंगामाचे विजेतेपद मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला अंतिम सामन्यात पराभूत करत जिंकले. दरम्यान,डिसेंबर 2023 मध्ये या स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाचा लिलावही पार पडला.

3. आशिया चषक

ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान झालेली आशिया चषक ही क्रिकेट स्पर्धाही यंदा चांगलीच चर्चेत राहिली. या स्पर्धेच्या आयोजनावरूनही यावर्षी बरीच चर्चा झाली. पाकिस्तान या स्पर्धेचे अधिकृत आयोजक होते. मात्र, भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे ही स्पर्धा पाकिस्तान आणि श्रीलंका अशा दोन देशांमध्ये आयोजित करण्यात आले.

भारतीय संघाचे सर्व सामने श्रीलंकेत पार पडले. तसेच अंतिम सामनाही श्रीलंकेत झाला. याशिवाय आशिया चषकात भारतीय संघाची कामगिरीही शानदार राहिली.

भारताने अंतिम सामन्यात श्रीलंकेला 10 विकेट्सने पराभूत करत आठव्यांदा आशिया चषक उंचावला. त्याचमुळे यंदा भारतात गुगलवर सर्वाधिक ट्रेंड होणाऱ्या क्रीडा स्पर्धांमध्ये आशिया चषक तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

2. वनडे वर्ल्डकप 2023

भारतात 13 वा वनडे वर्ल्डकप ऑक्टोबर - नोव्हेंबर दरम्यान खेळवण्यात आला. ही स्पर्धा भारतात गुगलवर दुसऱ्या क्रमांकाची ट्रेंड होणारी क्रीडा स्पर्धा ठरली. या स्पर्धेत भारतासह, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश, नेदरलँड्स, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे 10 संघ सहभागी झाले होते.

यातील भारताने न्यूझीलंडचा, तर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा उपांत्य फेरीत पराभव करत अंतिम फेरी गाठली होती.

अहमदाबादला झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ६ विकेट्सने पराभूत करत सहाव्यांदा विश्वविजेतेपद पटकावले.याच सामन्यादरम्यान विराट कोहलीने ५० वे वनडे शतक केले, तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने सलग १० सामने जिंकले होते.

1. आयपीएल 2023

इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) 16 वा हंगाम यावर्षी खेळवण्यात आला. ही क्रिकेट स्पर्धा या वर्षी भारतात गुगलवर सर्वाधिक ट्रेंडमध्ये राहिली. या स्पर्धेत 10 संघ सहभागी झाले होते. दरम्यान, हा हंगाम चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीचा अखेरचा हंगाम असल्याचीही चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. मात्र त्याने तो पुढीलवर्षीही खेळणार असल्याचे स्पष्ट केले.

या हंगामच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन संघ पोहचले होते. अंतिम सामना पावसामुळे राखीव दिवशी खेळवण्यात आला. अंतिम सामन्यात धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई संघाने विजय मिळवत पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद जिंकले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT