Sporting Club Goa  Kishor Petkar
क्रीडा

स्पोर्टिंग क्लब, कळंगुटचा ‘पंचतारांकित’ विजय

स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने यूथ क्लब ऑफ मनोरा संघाचा ५-० फरकाने धुव्वा उडविला

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (जीएफए) प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत गतविजेत्या स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने ‘पंचतारांकित’ विजयाची नोंद करताना यूथ क्लब ऑफ मनोरा संघाचा ५-० फरकाने धुव्वा उडविला. सामना सोमवारी घोगळ मडगाव येथील चौगुले महाविद्यालय मैदानावर झाला. (Sporting Club The Goa defeated Youth Club of Manora in GFA Professional League football tournament)

म्हापसा (Mhapsa) येथील धुळेर स्टेडियमवर (Dhuler Stadium) सोमवारी कळंगुट असोसिएशननेही मोठ्या विजयाला गवसणी घालताना वेळसाव स्पोर्टस अँड कल्चरल क्लबला ५-१ फरकाने पराजित केले.

विश्रांतीला स्पोर्टिंग क्लबने तीन गोलची आघाडी घेतली होती. रोहित तोताड याने १९व्या मिनिटास संघाचे गोलखाते (Goal) उघडले. नंतर लॉईड कार्दोझ याने दोन गोल केले. त्याने २८व्या मिनिटास मैदानी गोल नोंदविल्यानंतर ३७व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर चेंडूस अचूक दिशा दाखविली. सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात स्पोर्टिंगच्या खाती आणखी दोन गोलची भर पडली. ८६व्या मिनिटास बदली खेळाडू लिस्टन कार्दोझने, तर ९०+३व्या मिनिटास क्लाईव्ह मिरांडाने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल नोंदविला.

कळंगुटच्या विजयात २० वर्षांखालील खेळाडू ज्योवितो फर्नांडिस याने दोन गोल केले. त्याने अनुक्रमे २६ व ६५व्या मिनिटास चेंडूला गोलनेटची (Goal) अचूक दिशा दाखविली. याशिवाय निक्सन कास्ताना याने ४७व्या, मोझेस डिसा याने ८३व्या, तर बदली खेळाडू चैतन दाभोळकर याने ८४व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल नोंदविला. वेळसाव क्लबचा एकमात्र गोल ४२व्या मिनिटास रोहन रॉड्रिग्ज याने केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"गोव्याच्या खाण उद्योगाला पुन्हा लागणार ब्रेक?" निर्यात शुल्काच्या शक्यतेने व्यावसायिकांची झोप उडाली; कामगारांच्या रोजगारावर टांगती तलवार

VIDEO: "9 मे ला धमक्या दिल्या अन् 10 मे ला गयावया केली!" UN मध्ये भारतानं पाकिस्तानचा फाडला बुरखा; ऑपरेशन सिंदूरवरुन सणसणीत टोला

T20 World Cup 2026: पाकिस्तानच्या जागी टी-20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशची होणार एन्ट्री? पीसीबीच्या धमकीनंतर आयसीसी घेणार मोठा निर्णय

Viral Post: 'गोव्यात भारी वाटलं, परत निघताना मात्र त्रास का'? सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल; बस, टॅक्सीवरती नेटकऱ्यांच्या कमेंट्स

"पाकिस्तान 12 तासांनी भारताचा मोठा भाऊ", पृथ्वीराज चौहान कॉलेजच्या प्राचार्यांची घसरली जीभ; सोशल मीडियावर उठलं वादळ VIDEO

SCROLL FOR NEXT