Spain  Dainik Gomantak
क्रीडा

FIFA Women's World Cup: स्पेन नवा विश्वविजेता! फायनलमध्ये इंग्लंडला चारली पराभवाची धूळ

Spain vs England: स्पेनच्या महिला संघाने फिफा महिला वर्ल्डकप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले असून फायनलमध्ये इंग्लंड महिला संघ पराभूत झाला.

Pranali Kodre

Spain Won FIFA Women World Cup 2023:

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे फिफा महिला वर्ल्डकप 2023 स्पर्धा पार पडली असून या स्पर्धेचे विजेतेपद स्पेनच्या महिला संघाने जिंकले आहे. रविवारी सिडनीत झालेल्या अंतिम सामन्यात स्पेनने इंग्लंडच्या महिला संघाला 1-0 अशा गोलफरकाने पराभूत करत विश्वविजेतेपद जिंकले.

अंतिम सामन्यात स्पेनकडून ओल्गा कार्मोना हिने पहिल्याच हाफमध्ये सामन्याच्या 29 व्या मिनिटाला गोल केला होता. तिचा हा गोल स्पेनसाठी महत्त्वाचा ठरला. तिच्या या गोलमुळे स्पेनने वर्ल्डकपवर नाव कोरले.

विशेष म्हणजे इंग्लंड आणि स्पेन या दोन्ही संघांनी पहिल्यांदाच फिफा महिला वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. त्यामुळे यंदा या स्पर्धेला नवा विजेता मिळणार हे निश्चित होते.

अंतिम सामन्यात स्पेन आणि इंग्लंड या दोन्ही संघांनी आक्रमक सुरुवात केली होती. पण सुरुवातीला दोन्ही संघांना एकमेकांचा बचाव भेदता येत नव्हता. पण कार्मोनाला 29 व्या मिनिटाला संधी मिळाली आणि तिने डाव्या बाजूने येत गोल नोंदवला. या गोलसह स्पेनने गोलचे खाते उघडले.

यानंतरही दोन्ही संघांचे गोलसाठी प्रयत्न सुरू होते. पहिल्या हाफच्या अखेरीस स्पेनकडून सलमा पॅरालुएलोने गोल करण्याचा प्रयत्न केलेला. मात्र, चेंडू गोलपोस्टला लागला. त्यामुळे ही संधी हुकली. त्यामुळे पहिल्या हाफनंतर स्पेन 1-0 अशा आघाडीवर होते.

दुसऱ्या हाफमध्ये स्पेनने आपली आघाडी कायम ठेवत भक्कम बचाव केला. त्यामुळे इंग्लंडला गोल करता आला नाही. 69 व्या मिनिटालाही स्पेनला पेनल्टीवर दुसरा गोल करण्याची संधी मिळालेली. पण इंग्लंडची गोलकिपर मेरी एरप्सने चांगला बचाव करत हा गोल रोखला. मात्र, इंग्लंडला अखेरीसपर्यंत गोल करता आला नाही. त्यामुळे स्पेनने वर्ल्डकप जिंकला.

स्पेन आणि इंग्लंड यांच्यात यापूर्वी 13 वेळा सामने झाले होते. यात फक्त दोनदाच इंग्लंड पराभूत झाले होते. पण असे असले तरी रविवारी अंतिम सामन्यात मात्र स्पेनचा संघच इंग्लंडला भारी पडला.

विशेष गोष्ट अशी की कार्मोनाने स्पेनसाठी 17 वर्षांखाली आणि 20 वर्षांखालील वर्ल्डकपही जिंकला आहे. आता तिने वरिष्ठ स्तरावरील वर्ल्डकपही जिंकण्याचा कारनामा केला.

दरम्यान, या स्पर्धेत शनिवारी (19 ऑगस्ट) स्विडन आणि ऑस्ट्रेलिया देशांच्या महिला संघात तिसऱ्या क्रमांकासाठी सामना झाला होता. या सामन्यात स्विडनने २-० अशा गोलफरकाने विजय मिळवत तिसरा क्रमांक पटकावला. त्यामुळे यजमान ऑस्ट्रेलिया चौथ्या क्रमांकावर राहिले.

या स्पर्धेत स्विडनला स्पेनविरुद्ध आणि ऑस्ट्रेलियाला इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे हे दोन्ही संघ तिसऱ्या क्रमांकाचा सामना खेळले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT