Team India PTI
क्रीडा

SA vs IND: नववर्षाची भारताकडून दणक्यात सुरुवात! 92 वर्षांत पहिल्यांदाच प्रतिस्पर्धी 55 धावांत 'ऑलआऊट'

South Africa vs India: भारतीय संघाविरुद्ध केपटाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिका 55 धावांवर सर्वबाद झाल्याने त्यांच्या नावावर नकोसा विक्रम झाला आहे.

Pranali Kodre

South Africa vs India 2nd Test at Cape Town:

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात बुधवारपासून (3 जानेवारी) कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरू झाला आहे. केपटाऊनधील न्युलँड्स स्टेडियमवर हा सामना होत आहे. या सामन्यात भारतीय संघाने मोठा विक्रम केला आहे.

या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिका संघाला 23.2 षटकात 55 धावांवर सर्वबाद केले. त्यामुळे ही भारताविरुद्धची कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील निचांकी धावसंख्या ठरली. 1932 पासून भारताने 500 हून अधिक सामने खेळले आहेत, मात्र यापूर्वी कधीही भारताने प्रतिस्पर्धी संघाला 60 धावांच्या आत सर्वबाद केले नव्हते.

यापूर्वी भारताविरुद्ध कसोटीत निचांकी धावसंख्या नोंदवण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या नाववर आहे. न्यूझीलंडने मुंबईत 2021 मध्ये कसोटी सामना खेळताना भारताविरुद्ध सर्वबाद 62 धावा केल्या होत्या. तसेच त्याआधी दक्षिण आफ्रिका 2015 साली नागपूर कसोटीत भारताविरुद्ध 79 धावांवर सर्वबाद झाले होते.

भारताविरुद्ध कसोटीत निचांकी धावसंख्या नोंदवणारे संघ

  • 55 धावा - दक्षिण आफ्रिका, केपटाऊन, 2024

  • 62 धावा - न्यूझीलंड, मुंबई, 2021

  • 79 धावा - दक्षिण आफ्रिका, नागपूर, 2015

  • 81 धावा - इंग्लंड, अहमदाबाद, 2021

  • 82 धावा - श्रीलंका, चंदीगढ़, 1990

सिराजच्या 6 विकेट्स

दरम्यान, या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने सर्वाधिक विकेट्स स्लीपमध्ये झेल देत गमावल्या. दक्षिण आफ्रिकेकडून केवळ डेव्हिड बेडिंगघम (12) आणि काईल वेरेयन (15) यांनाच दोन आकडी धावसंख्या गाठता आली.

बाकी 8 फलंदाज 10 धावांचा टप्पाही पार करू शकले नाहीत. दरम्यान 10 धावांच्या आत बाद झालेल्या 8 फलंदाजांपैकी फक्त मार्को यान्सिनच शुन्यावर बाद झाला. बाकी सर्वांनी किमान 1 धाव तरी काढली.

भारताकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने 15 धावा देत 6 विकेट्स घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

SCROLL FOR NEXT