South African Team Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SA: भारत दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, संपूर्ण वेळापत्रक पाहा

South African Team: दक्षिण आफ्रिकेने भारतात 6 ते 11 ऑक्टोबर दरम्यान खेळल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी 15 जणांचा संघ जाहीर केला आहे.

दैनिक गोमन्तक

South African Team: दक्षिण आफ्रिकेने भारतात 6 ते 11 ऑक्टोबर दरम्यान खेळल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी 15 जणांचा संघ जाहीर केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत भारत दौऱ्यावर तीन सामन्यांची टी-20 मालिकाही खेळणार आहे. ऑक्‍टोबर-नोव्‍हेंबरमध्‍ये ऑस्‍ट्रेलियात होणार्‍या टी-20 विश्‍वचषक 2022 मध्‍ये सहभागी होणार्‍या टी-20 मालिकेसाठी हाच संघ भारताला भेट देईल. दक्षिण आफ्रिकेने मंगळवारीच भारत दौऱ्यावर टी-20 विश्वचषक आणि टी-20 मालिकेसाठी संघाची निवड केली आहे. त्याचबरोबर एकदिवसीय मालिकेसाठी वेगळा संघ निवडण्यात आला आहे.

दरम्यान, आफ्रिकन संघ 23 सप्टेंबरला भारत (India) दौऱ्यावर येणार असून त्यानंतर 28 सप्टेंबरपासून मालिका सुरु होईल. जानेमन मालनलाही वनडे संघात संधी देण्यात आली आहे. मात्र टी-20 मालिका आणि विश्वचषकासाठी संघात त्याची निवड झालेली नाही.

Iभारत दौऱ्यावरील एकदिवसीय मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ: टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, जानेमन मालन, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, वेन पारनेल, एंडिले फेहलुक्वायो, डी. कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी.

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक असे आहे.

तीन सामन्यांची टी-20 मालिका

पहिला T20, बुधवार, 28 सप्टेंबर - तिरुवनंतपुरम

दुसरा T20, रविवार, 02 ऑक्टोबर - गुवाहाटी

तिसरा T20, मंगळवार, 04 ऑक्टोबर - इंदूर

तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका

पहिला एकदिवसीय, गुरुवार, 06 ऑक्टोबर - रांची

दुसरी वनडे, रविवार, 09 ऑक्टोबर - लखनौ

तिसरी वनडे, मंगळवार, 11 ऑक्टोबर - नवी दिल्ली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

SCROLL FOR NEXT