Quinton de Kock and Rassie van der Dussen Twitter
क्रीडा

World Cup 2023: एक, दोन नाही, तर तब्बल तीन शतके! द. आफ्रिकेने 428 धावांचा डोंगर उभारत रचले विश्वविक्रम

South Africa vs Sri Lanka: वर्ल्डकप २०२३ मधील पहिलाच सामना खेळताना दक्षिण आफ्रिकेकडून डी कॉक, ड्यूसेन अन् मार्करम यांनी शतके झळकावत संघाला 400 धावांचा टप्पा पार करून दिला आहे.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, South Africa vs Sri Lanka:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील चौथा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका संघात खेळवला जात आहे. दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर सुरु असलेला या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ताबडतोड फलंदाजी केली आहे.

दरम्यान, स्पर्धेतील हा चौथा सामना असला, तरी या दोन्ही संघांसाठी हा या स्पर्धेतील त्यांचा पहिलाच सामना आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने आपल्या फलंदाजीतील क्षमता दाखवून दिली आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून तीन फलंदाजांनी शतके केली. दक्षिण आफ्रिकेने 50 षटकात 5 बाद 428 धावा केल्या.

या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाज करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने कर्णधार तेंबा बाऊमाची विकेट दुसऱ्याच षटकात गमावली होती. मात्र, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी टॉप गिअर टाकला.

आपला अखेरचा वर्ल्डकप स्पर्धा खेळत अलेल्या क्विंटन डी कॉकला रस्सी वॅन दर ड्युसेनची साथ मिळाली. या दोघांनीही तुफानी फलंदाजी करताना दुसऱ्या विकेटसाठी 31 षटकांच्या आतच द्विशतकी भागीदारी केली.

दरम्यान, डी कॉकला 31 व्या षटकात 100 धावांवर मथिशा पाथिरानाने बाद केले. डी कॉकने 84 चेंडूत ही खेळी करताना 12 चौकार आणि 3 षटकार मारले. तो बाद झाल्यानंतर काही वेळात ड्यूसेनही शतक करून बाद झाला. दुनिथ वेलालागेने त्याला बाद केले. ड्यूसेनने 110 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकारांसह 108 धावा केल्या.

यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या एडेन मार्करमनेही आक्रमक फलंदाजी केली. त्याला हेन्री क्लासेन आणि मिलरने चांगली साथ दिली. मार्करमने 54 चेंडूत 14 चौकार आणि 3 षटकारांसह 106 धावांची खेळी केली. क्लासेनने 20 चेंडूत 32 धावा केल्या.

अखेरीस मिलरने आक्रमक खेळताना 21 चेंडूत नाबाद 39 धावा केल्या, तर मार्को यान्सिनने 12 धावा केल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने सहज 428 धावांचा टप्पा गाठला.

दक्षिण आफ्रिकेने रचला विक्रम

दक्षिण आफ्रिकेने केलेल्या 428 धावा ही वनडे वर्ल्डकप इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. ऑस्ट्रेलियाने 2015 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध 417 धावा केल्या होत्या.

वनडे वर्ल्डकपमधील सर्वोच्च धावसंख्या

  • 428 धावा - दक्षिण आफ्रिका (विरुद्ध श्रीलंका, दिल्ली, 2023)

  • 417 धावा - ऑस्ट्रेलिया (विरुद्ध अफगाणिस्तान, पर्थ, 2015)

  • 413 धावा - भारत (विरुद्ध बर्मुडा, पोर्ट ऑफ स्पेन, 2007)

  • 411 धावा - दक्षिण आफ्रिका (विरुद्ध आयर्लंड, कॅमबेरा, 2015)

  • 408 धावा - दक्षिण आफ्रिका (विरुद्ध वेस्ट इंडिज, सिडनी, 2015)

तसेच वनडे वर्ल्डकपमध्ये 400 धावांचा टप्पा पार करण्याची ही दक्षिण आफ्रिकेची तिसरी वेळ आहे. त्याच्याव्यतिरिक्त कोणत्याच संघाला दोनदा देखील वर्ल्डकपमध्ये 400 धावा पार करता आलेल्या नाहीत. केवळ भारत आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी एकदा 400 धावा पार केल्या आहेत.

तसेच वनडे क्रिकेटच्या इतिहासातही सर्वाधिक आठव्यांदा दक्षिण आफ्रिकेने 400 धावांचा टप्पा पार केला आहे. त्यांच्यापाठोपाठ या यादीत भारत आहे. भारताने वनडेत 6 वेळा 400 धावा पार केल्या आहेत.

वनडेत एका डावात तीन शतके

याशिवाय वनडे क्रिकेटच्या इतिहासात एकाच डावात तीन शतके करण्याची एकूण ही चौथी वेळ होती, यातील तीनवेळा तर दक्षिण आफ्रिकेच्या संघानेच हा पराक्रम केला आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेकडून 2015 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध जोहान्सबर्गला हाशिम अमला, एबी डिविलियर्स आणि रिली रुसौ यांनी शतके केली होती.

तसेच 2015 मध्येच भारताविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेकडून डीकॉक, डेविलियर्स आणि फाफ डू प्लेसिस यांनी शतके केली होती. याशिवाय इंग्लंडकडून 2022 मध्ये नेदरलँड्सविरुद्ध ऍमस्टील्विनला झालेल्या सामन्यात डेव्हिड मलान, फिलिप सॉल्ट आणि जॉस बटलर यांनी शतके केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT