South Africa Squad Dainik Gomantak
क्रीडा

भारतापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचाही World Cup 2023 साठी संघ घोषित, 'या' खेळाडूकडे कॅप्टन्सी

South Africa Squad for World Cup 2023: वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर झाला आहे.

Pranali Kodre

South Africa announced Squad for World Cup 2023:

भारतात 5 ऑक्टोबरपासून 13 व्या वनडे वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला बरोबर एक महिनाच उरला असताना मंगळवारी (5 सप्टेंबर) भारतापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेने क्रिकेटच्या या कुंभमेळ्यासाठी 15 जणांच्या संघाची घोषणा केली आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे कर्णधारपद तेंबा बाऊमाकडेच कायम ठेवण्यात आले आहे. तसेच या संघात चकीत करणारे नाव म्हणजे गेराल्ड कोएत्झी. वेगवान गोलंदाज असलेल्या कोएत्झीने याच वर्षाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्याने आत्तापर्यंत वनडेत २ सामनेच खेळले असून 5 विकेट्स घेतल्या आहेत.

दरम्यान वर्ल्डकपसाठ दक्षिण आफ्रिकेच्या संघात क्विंटन डी कॉक, रिझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, एडेन मार्करम, डेव्हिड मिलर आणि रस्सी वॅन दर द्युसेन या अनुभवी फलंदाजांनाही संधी मिळाली आहे.

त्याचबरोबर वेगवान गोलंदाजीसाठी कागिसो रबाडा, एन्रिच नॉर्किया, लुंगी एन्गिडी असे पर्याय आहेत. त्याचबरोबर केशव महाराज आणि ताब्राईज शम्सी हे फिरकीपटू संघात आहेत. भारतात सामने होणार असल्याने त्यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.

दक्षिण आफ्रिका या वर्ल्डकप स्पर्धेत पहिला सामना दिल्लीमध्ये ७ ऑक्टोबर रोजी खेळणार आहे. त्यापूर्वी त्यांना २९ सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध आणि २ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध सराव सामना खेळायचा आहे.

  • असा आहे दक्षिण आफ्रिकेचा संघ - तेंबा बाऊमा (कर्णधार), गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रिझा हेंड्रिक्स, मार्को यान्सिन, हेन्रिक क्लासेन, सिसांडा मगला, केशव महाराज, एडेन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एन्गिडी, एन्रिच नॉर्किया, कागिसो रबाडा, ताब्राईज शम्सी, रस्सी वॅन दर द्युसेन.

भारतीय संघाचीही घोषणा

मंगळवारी दक्षिण आफ्रिकेचा संघ घोषित होण्यापूर्वी बीसीसीआयने वर्ल्डकपसाठी भारताचाही १५ जणांचा संघ जाहीर केला आहे. भारताचे कर्णधारपद रोहित शर्मा सांभाळणार आहे, तर हार्दिक पंड्या उपकर्णधार आहे.

  • भारताचा संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात नाताळची जय्यत तयारी! बाजारपेठांमध्ये 'ख्रिसमस'ची धूम; 10 फुटी झाडांनी वेधलं लक्ष

Budh Chandra Yuti: 2026 च्या सुरुवातीलाच 'बुध-चंद्र' युतीचा धमाका! धनु राशीत राजकुमार आणि मनाचा कारक एकत्र; 'या' 3 राशींच्या लोकांचे पालटणार नशीब

मसाजसाठी गेली अन् नकोसा अनुभव आला, गोव्यातील स्पा सेंटरमध्ये महिला पर्यटकाचा विनयभंग; वर्का येथील प्रकाराने खळबळ

Goa Nightclub Fire: 'बर्च' दुर्घटना, पाचही संशयित 14 दिवस न्यायालयीन कोठडीत!

IND VS SA: धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका सामना रद्द, चाहत्याचं भंगलं स्वप्न; BCCIवर संताप

SCROLL FOR NEXT