Lenny Rodrigie 
क्रीडा

खूप काही साध्य करायचेय : लेनी

किशोर पेटकर

पणजी,

एफसी गोवा संघातून खेळताना अजून खूप काही साध्य करण्याचे ध्येय अनुभवी मध्यरक्षक लेनी रॉड्रिग्ज याने बाळगले आहे. या ३३ वर्षीय खेळाडूने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत मागील दोन मोसमात संघाकडून सर्व सामने खेळण्याचा मान मिळवलाय.

एफसी गोवाने २०२२ पर्यंत लेनीचा करार वाढविला आहे. आगामी दोन वर्षांत एफसी गोवासाठी हा हुकमी सेंट्रल मध्यरक्षक आधारस्तंभ असेल. मागील दोन मोसमात एफसी गोवा आयएसएल स्पर्धेत खेळलेल्या सर्व सामन्यांत लेनीने संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तो २०१८-१९ मोसमात एफसी गोवा संघात दाखल झाला, त्या मोसमात संघाने आयएसएल स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली, तर सुपर कप स्पर्धेत विजेतेपद मिळविले.

एफसी गोवा संघ खूप जवळचा

एफसी गोवा संघातून खेळण्याविषयी लेनीने सांगितले, की ‘‘व्यक्तिशः मला कुठे राहायचेय याबाबत दुसरा विचार करतच नाही. हा क्लब माझ्या ह्रदयात खूप जवळचा आहे. प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास, दोन वर्षांपूर्वी या क्लबमध्ये रुजू झाल्यानंतर मी खूप मोठ्या घटनांचा आनंद लुटला आहे आणि मला माझ्या फुटबॉलचा आनंद घेत राहायचेय, तसेच संघासाठी आणि गोव्यातील लोकांसाठी आणखीनच गौरव मिळवायचाय.’’ एफसी गोवा संघाचे तत्वज्ञान, चाहत्यांचा पाठिंबा आदी आपल्यासाठी योग्य असून येथे राहिल्याने खेळावर पूर्णपणे लक्ष एकाग्र करू शकल्याची लेनीने मान्य केले.

आगामी मोसम महत्त्वाचा

‘‘क्लबची उत्क्रांती आणि वाटचालीने मी खूप आनंदी आहे. आमच्यासमोर खूप महत्त्वाचा मोसम आहे. आयएसएलमध्ये गतमोसमापेक्षा चांगली कामगिरी करण्यावर आम्हा लक्ष द्यावे लागेल. चँपियन्स लीगच्या आघाडीवर, खंडीय पातळीवरील मोठ्या फुटबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करायला मिळतेय हा आमच्यासाठी बहुमान आहे,’’ असे लेनी आगामी मोसमाबद्दल म्हणाला. एफसी गोवापाशी चांगले खेळाडू असल्याचे लेनीला वाटते. ‘‘गतमोसमात आम्ही सेरिटन, ह्युगो, ब्रँडन यांच्याशी, तर यंदाच्या मोसमात एदू याच्याशी दीर्घकालीन करार केला. विंग्समध्ये रेडीममुळे मोठी भर पडली आहे. आगामी काळासाठी मी खरोखरच उत्साहित आहे,’’ असे लेनी म्हणाला.

सुधारण्यास अजूनही वाव

मागील दोन मोसम लेनी एफसी गोवाच्या संघ प्रणालीतील महत्त्वाचा दुवा ठरला आहे. त्याची मैदानावरील उपस्थिती आणि परिणामकारक कामगिरी अधोरेखित झालेली आहे. गतमोसमातील आयएसएल स्पर्धेत त्याने भारतीय खेळाडूंत सर्वाधिक पास पूर्ण केले. ‘‘येथे मागील दोन वर्षांत आम्ही एकत्रित भव्य यश मिळविले, तरीही सुधारण्यासाठी अजूनही वाव आहे असे मला वाटते आणि त्यासाठी येत्या वर्षांत मी प्रयत्नशील असेन,’’ अशी कबुली लेनीने दिली.

एफसी गोवातर्फे लेनी रॉड्रिग्जची कामगिरी

- आयएसएल स्पर्धेत २०१८-१९ व २०१९-२० मोसम

- मध्यफळीत एकूण ४१ सामने, २ गोल, १ असिस्ट

- सुपर कप विजेतेपद : २०१९

- लीग विनर्स शिल्ड : २०१९-२०

- आयएसएल उपविजेतेपद : २०१८-१९

संपादन - अवित बगळे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT