Snake in Lanka Premier League Dainik Gomantak
क्रीडा

Video: शेजारी सापाला पाहून फिल्डरचा उडाला थरकाप, कॅमरामनही घाबरले; श्रीलंकेच्या क्रिकेट मैदानात दहशत

Lanka Premier League: लंका प्रीमियर लीग स्पर्धेत सापांची दहशत दिसून येत असून अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

Snake scares Isuru Udana and Cameraman in Lanka Premier League: श्रीलंकेत सध्या लंका प्रीमियर लीग 2023 स्पर्धा खेळली जात आहे. पण या स्पर्धेत पाऊस-वारा अशा गोष्टींमुळे नाही, तर सापांमुळे अडथळा येत असल्याचे दिसत आहे. या स्पर्धेतील दोन सामन्यांमध्ये साप मैदानात आल्याचे आढळले आहे.

या स्पर्धेतील शनिवारी (12 ऑगस्ट) बी-लव्ह कँडी आणि जाफना किंग्स यांच्यात आर प्रेमदासा स्टेडियमवर सामना झाला. या सामन्यादरम्यान दोनदा सापाचा वावर मैदानात आढळला.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की जाफना किंग्स संघ धावांचा पाठलाग करत असताना बी-लव्ह कँडीकडून वेगवान गोलंदाज इसुरू उडाना क्षेत्ररक्षण करत होता.

याचवेळी त्याला अचानक त्याच्या शेजारी साप सरपटत जाताना दिसला. ते पाहून ते घाबरला. कारण त्याने सापाला पाहिले नसते तर कदाचीत त्याचा पायही त्याच्यावर पडू शकला असता. पण इसरू उडानाने साप पाहाताच तो दूर झाला.

तसेच या सामन्यादरम्यान बाउंड्री लाईनजवळूनही इलेक्ट्रिक वायर्सवरुन साप सरपटताना दिसला होता. त्यावेळी दोन कॅमेरामन त्यांच्या कॅमेरा सेटअपपासून दूर जाऊन थांबले होते. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

याआधीही घडलेली घटना

दरम्यान, यापूर्वी लंका प्रीमियर लीग 2023 मध्येच 31 जुलैला गॉल टायटन्स आणि डंबुल्ला ऑरा यांच्यातील सामन्यादरम्यान देखील साप दिसला होता. त्यावेळीही काही वेळासाठी सामना थांबवण्यात आला होता.

सापाची दहशत

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की 30 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेतील काही सामने श्रीलंकेतील आर प्रेमदासा स्टेडियमवरच खेळवले जाणार आहेत. त्यामुळे काही चाहत्यांनी या मैदानात सापाच्या वावराबद्दल भीती व्यक्त केली आहे.

बी-लव्ह कँडीचा विजय

दरम्यान, शनिवारी झालेल्या सामन्यात बी-लव्ह कँडीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 178 धावा केल्या होत्या. त्यानंतर 179 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जाफना किंग्सला 20 षटकात 6 बाद 170 धावाच करता आल्या. त्यामुळे बी-लव्ह कँडी संघाने 8 धावांनी सामना जिंकला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT