Smriti Mandhana Dainik Gomantak
क्रीडा

Women's T20 World Cup: स्मृती मानधनाने केले मोठे रेकॉर्ड, पहिल्यांदाच महिला टी-20 मध्ये...

Smriti Mandhana: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर स्मृती मानधना सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे.

Manish Jadhav

Women's T20 World Cup: भारतीय महिला संघाची स्टार सलामीवीर स्मृती मानधना सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या आयसीसी महिला टी-20 विश्वचषकात तिने आणखी एक अर्धशतक झळकावले.

मानधनाने सोमवारी आयर्लंडविरुद्ध 56 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 87 धावा केल्या. तिचा हा डाव 19व्या षटकात संपला. टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत तिने 22 वे अर्धशतक ठोकले. स्मृतीने तुफानी खेळी खेळून मोठे विक्रम आपल्या नावावर केले. चला तर मग जाणून घेऊया तिने केलेल्या विक्रमांबद्दल.

दरम्यान, महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून मानधनाच्या नावावर सर्वात मोठ्या खेळीचा विक्रम नोंदवला गेला आहे. तिने स्वतःचाच विक्रम मोडला. मानधनाने यापूर्वी 2019 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) 86 आणि 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 83 धावा केल्या होत्या.

तसेच, दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) भूमीवर महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारी मानधना भारतीय खेळाडू ठरली आहे. तिच्या आधी हा विक्रम माजी कर्णधार मिताली राजच्या नावावर होता, जिने 2018 मध्ये नाबाद 76 धावा केल्या होत्या.

दुसरीकडे, महिला T20 विश्वचषक स्पर्धेत भारताने प्रथमच दोन 50+ भागीदारी सामायिक केल्या. मानधनाने शफाली वर्मासोबत पहिल्या विकेटसाठी 62 धावांची आणि हरमनप्रीत कौरसोबत दुसऱ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली.

महिला T20 विश्वातील एका सामन्यात पहिल्या आणि दुसऱ्या विकेटसाठी 50+ भागीदारी करणारा भारत हा दुसरा संघ आहे. भारतापूर्वी ऑस्ट्रेलियाने 2014 मध्ये पाकिस्तानविरुद्ध अशी कामगिरी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drugs Case: पोलिसांच्या सापळ्यात अडकला ड्रग्ज विक्रेता! साडेसहा लाखांचे चरस हस्तगत; झारखंडच्या तरुणास अटक

Rashi Bhavishya 27 October 2024: विवाहाचा विषय मार्गी लागेल,धनलाभ देखील होईल; आजचा दिवस अत्यंत महत्वाचा

Content Creators Fair Goa: लाखो कमवण्याचा फंडा; एम. एस. धोनीने कंटेंट क्रिएटर्संना दिला लाखमोलाचा कानमंत्र

Goa Crime: फुलांच्या विक्रीवरुन हाणामारी, सुरी हल्ल्यात दोघेही जखमी; कोलवाळ-चिखली जंक्शनवरील घटना

Goa Crime: झुआरी पूलावरुन उडी मारुन 22 वर्षीय पोलिस शिपायाने संपवले जीवन; मृतदेहाचा शोध सुरु

SCROLL FOR NEXT