Smriti Mandhana Harmanpreet Kaur Dainik Gomantak
क्रीडा

स्मृती मंधाना विराट-रोहितसोबत खास क्लबमध्ये दाखल, हरमनप्रीतने मोडला मितालीचा मोठा विक्रम

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मंधाना हिने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली आहे. मंधानाने आज शनिवारी डंबुलामध्ये श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात 39 धावांची शानदार खेळी केली. आपल्या खेळीदरम्यान तिने 34 चेंडूंचा सामना केला, ज्यामध्ये तिने 8 चौकार मारले. तर दुसरीकडे हरमनप्रीतने भारताची माजी महिला कर्णधार मिताली राजचा विक्रम मोडला आहे.(Smriti Mandhana Harmanpreet Kaur)

मंधानाने आता टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या आहेत.विराट कोहली आणि रोहित शर्मासोबत ती टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील स्पेशल क्लबमध्येही सामील झाली आहे.T20I मध्ये 2000 किंवा त्याहून अधिक धावा करणारी ती तिसरी भारतीय महिला क्रिकेटपटू बनली आहे.

विराट आणि रोहितसोबत स्पेशल क्लबमध्ये सामील

T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावा करणारी मंधाना ही पाचवी भारतीय फलंदाज ठरली आहे. मंधानापूर्वी विराट कोहली, रोहित शर्मा, मिताली राज आणि हरमनप्रीत कौर यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. मंधानाही आता या यादीत सामील झाली आहे.

हरमनप्रीत कौरने मिताली राजचा मोठा विक्रम मोडला

या मालिकेत हरमनप्रीतने इतिहास रचला आहे. तिने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिताली राजचा विक्रम मोडला आहे. हरमनप्रीत आता T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी भारतीय महिला क्रिकेटपटू बनली आहे. मितालीने 2019 मध्ये या शॉर्ट फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. हरमप्रीतच्या आता 123 सामन्यात 2372 धावा आहेत तर मितालीच्या 2364 धावा आहेत.

T20I मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला क्रिकेटपटू

2372 - हरमनप्रीत कौर

2364 - मिताली राज

2011 - स्मृती मानधना

1094 - जेमिमा रॉड्रिग्ज

भारताने T20I मालिका जिंकली

भारतीय महिला क्रिकेट संघाने शनिवारी डंबुला येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 थ्रिलर सामन्यात श्रीलंकेचा 5 गडी राखून पराभव केला.या विजयासह भारतीय महिला संघाने तीन सामन्यांची मालिका जिंकली आहे.भारताने या मालिकेतील पहिला सामना 34 धावांनी जिंकला होता तर तिसरा आणि अंतिम सामना 27 जून रोजी याच स्टेडियमवर खेळवला जाईल. दुसऱ्या सामन्यात भारताने श्रीलंकेला 20 षटकांत 7 बाद 125 धावांवर रोखले आणि त्यानंतर 19.1 षटकांत 5 गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT