India Sports Awards: भारतभरात 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. 2012 सालापासून हा दिवस साजरा केला जातो. हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणाऱ्या मेजर ध्यानचंद यांची 29 ऑगस्ट रोजी जयंती असते. त्याचमुळे हा दिवसही क्रीडा दिन म्हणून ओळखला जातो.
दरम्यान, भारतात खेळात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा आणि प्रशिक्षकांचा गौरवही दरवर्षी केला जातो. त्यासाठी विविध पुरस्कारही भारत सरकारकडून दिले जातात. भारत सरकारकडून 6 मोठे क्रीडा पुरस्कार दिले जातात. याच क्रीडा पुरस्कारांबद्दल जाणून घेऊ.
भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार म्हणून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराला ओळखले जाते. 1991-92 मध्ये या पुरस्काराला सुरुवात झाली. सुरुवातीला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखले जात होते. पण 2021 मध्ये या पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार करण्यात आले.
चार वर्षांपेक्षा अधिक काळ खेळात शानदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार विजेत्या खेळाडूला ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि २५ लाख रोख बक्षीस दिले जाते.
चारवर्षे सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात येते. 1961 मध्ये या पुरस्काराला सुरुवात झाली असून आत्तापर्यंत अनेक खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार विजेत्या खेळाडूला ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि 15 लाख रोख बक्षीस दिले जाते.
साल 1985 साली द्रोणाचार्य पुरस्काराला सुरुवात झाली. प्रशिक्षकांना देण्यात येणारा हा भारताचा सर्वोच्च पुरस्कार आहे. भारतासाठी दिग्गज खेळाडू घडवणाऱ्या प्रशिक्षकांचा या पुरस्काराने गौरविले जाते. हा पुरस्कार विजेत्या प्रशिक्षकाला ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि 15 लाख रोख बक्षीस दिले जाते.
हॉकीचे जादूगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेजर ध्यानचंद यांच्या नावाने 2002 साली मेजर ध्यानचंद पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. खेळात चांगली कामगिरी करणाऱ्या आणि खेळाचा प्रसार करण्यासाठी दिलेले योगदान लक्षात घेत हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार विजेत्याला ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि 10 लाख रुपये दिले जातात.
भारतातील सर्वात जुना क्रीडा पुरस्कार म्हणून मौलाना अब्दुल कलाम अझाद पुरस्कार ओळखला जातो. भारताचे स्वातंत्र्यसैनिक आणि देशाचे पहिले शिक्षण मंत्री अबुल कलाम आझाद यांच्या सन्मानार्थ त्यांचे नाव या पुरस्काराला देण्यात आले.
वर्षभरात आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कार विजेत्या विद्यापीठाला ट्रॉफी आणि 15 लाख रुपये रोख बक्षीस दिले जाते.
तीन वर्षांच्या कालावधील क्रीडा संवर्धन आणि विकासाच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संस्था किंवा कॉर्पोरेट्स आणि व्यक्तींना या पुरस्काराने गौरविले जाते. 2009 पासून हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार विजेत्यांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी दिली जाते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.