Virat Kohli and Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

India vs Sri Lanka: वनडे मालिकेदरम्यान विराट-रोहितसह 'या' 6 भारतीय खेळाडूंकडे सर्वांचीच नजर

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान 6 भारतीय खेळाडूंकडे सर्वांचेच लक्ष राहाणार आहे.

Pranali Kodre

India vs Sri Lanka: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. यामालिकेतील पहिला सामना गुवाहाटी येथे होणार असून दुसरा सामना 12 जानेवारी रोजी कोलकाता येथे आणि तिसरा सामना 15 जानेवारी रोजी तिरुअनंतपुरम येथे खेळवला जाणार आहे.

या मालिकेतून भारतीय संघात विराट कोहली-रोहित शर्मासारख्या दिग्गज खेळाडूंचे पुनरागमन होणार आहे. दरम्यान, यावर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकपच्या दृष्टीने भारतीय संघ या मालिकेपासून तयारीला सुरुवात करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मालिकेदरम्यान काही खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष राहणार आहे. अशाच 5 भारतीय खेळाडूंचा आढावा घेऊया.

Virat Kohli

विराट कोहली - भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली श्रीलंकेविरुद्ध झालेल्या टी20 मालिकेचा भाग नव्हता. त्याने या विश्रांती दरम्यान त्याच्या कुटुंबियांबरोबर वेळ घालवला होता. दरम्यान, विराटची कामगिरी गेल्या काही वर्षांपासून खालावली होती. पण गेल्यावर्षाच्या अखेरीस त्याची कामगिरी चांगली झाली. त्यामुळे यावर्षीही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

Rohit Sharma

रोहित शर्मा - भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा गेल्या महिन्यात बांगलादेश दौऱ्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या हाताच्या अंगठ्याला क्षेत्ररक्षणादरम्यान चेंडू लागला होता. त्यामुळे त्याला बांगलादेशविरुद्ध तिसऱ्या वनडेत आणि कसोटी मालिकेत खेळता आले नव्हते.

तसेच त्याला श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेदरम्यान देखील विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे आता तो दुखापतीनंतर कसे पुनरागमन करणार हे पाहावे लागेल. त्याचबरोबर गेल्या वर्षात त्याला फार खास कामगिरीही करता आली नव्हती, त्यामुळे येत्यावर्षात तो त्याची लय परत मिळवेल अशी चाहत्यांना अपेक्षा असेल.

KL Rahul

केएल राहुल - यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत यष्टिरक्षक आणि फलंदाज अशा दुहेरी भूमिकेत दिसू शकतो. त्याला आगामी वनडे मालिकेसाठी भारतीय संघातील स्थान पक्के करण्याच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची असणार आहे.

तसेच त्याची कामगिरीही गेल्या काही दिवसात चांगली झालेली नाही. त्यामुळे त्याच्यावर मोठ्याप्रमाणात टीकाही झाली. त्याला आता त्याच्या कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे.

Hardik Pandya

हार्दिक पंड्या - बीसीसीआयने हार्दिक पंड्याला आता भारताच्या मर्यादीत षटकांच्या क्रिकेट संघाचे उपकर्णधार केले आहे. त्यामुळे आता कर्णधार रोहित शर्माच्या साथीने भारतीय संघाला कसे पुढे घेऊन जातो हे पाहाणे महत्त्वाचे राहिल.

त्याचबरोबर आगामी काळातील काही महत्त्वाच्या मालिका लक्षात घेता, त्याची तंदुरुस्तीही महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे तो त्याची तंदुरुस्ती आणि त्याचा खेळ याचा समतोल साधत कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष राहिल.

Axar Patel

अक्षर पटेल - श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेत अक्षर पटेलने गोलंदाजीबरोबरच खालच्या फळीत फलंदाजीमध्ये दिलेल्या योगदानामुळे सर्वांना प्रभावित केले होते. त्याची हीच शैली त्याला फायद्याची ठरू शकते. त्यामुळे त्याला वनडे मालिकेतही संधी मिळू शकते. तसेच त्याने वनडेतही चांगली कामगिरी केल्यास तो टी20 वर्ल्डकपप्रमाणेच वनडे वर्ल्डकपच्या दृष्टीनेही भारतीय संघात दावेदारी ठोकू शकतो.

Umran Malik

उमरान मलिक - उमरान मलिकने त्याच्या वेगाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही आपली छाप पाडली आहे. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेतही सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे आता तो आगामी काळातही त्याच्या वेगाच्या जोरावर वर्चस्व गाजवणार का हे पाहायला चाहते उत्सुक आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

SCROLL FOR NEXT