Team India: टीम इंडियाचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या जाण्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक कोण होणार याबाबत एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे. या वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2023 मध्ये भारतीय भूमीवर होणार्या 2023 विश्वचषक स्पर्धेनंतर राहुल द्रविड यांचा करार संपत आहे, परंतु BCCI ने आधीच टीम इंडियाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाची निवड केली आहे.
राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा करार संपल्यानंतर व्हीव्हीएस लक्ष्मण हे भारतीय संघाचे पुढील मुख्य प्रशिक्षक असतील. न्यूज18 क्रिकेट नेक्स्ट मधील एका अहवालात असे म्हटले आहे की, बीसीसीआयने द्रविड यांना भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कायम ठेवण्याचा विचार न केल्यास व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांना पुढील मुख्य प्रशिक्षक बनवले जाऊ शकते.
राहुल द्रविड यांच्या अनुपस्थितीत 48 वर्षीय लक्ष्मण यांची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते आयर्लंडविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेसाठी तसेच इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या T20 आणि जून 2022 मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघासोबत होते. द्रविड यांना कोरोनाची लागण झाली तेव्हा संयुक्त अरब अमिरातीमध्ये टी-20 आशिया कपच्या 2022 हंगामासाठीही ते भारतीय संघासोबत होते. नुकतेच ते न्यूझीलंडला त्यांच्या पांढऱ्या चेंडूच्या दौऱ्यासाठी संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गेले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.