PV Sindhu Dainik Gomantak
क्रीडा

Singapore Badminton Open: पीव्ही सिंधूचा विजय, सेमिफायनलमध्ये धडक

मे महिन्यात झालेल्या थायलंड ओपननंतर सिंधूने प्रथमच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

दैनिक गोमन्तक

दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने (PV Sindhu) सिंगापूर ओपन सुपर 500 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत चीनच्या हान युईला एका तासापेक्षा जास्त चाललेल्या सामन्यामध्ये पराभूत केले आहे. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकाच्या खेळाडूने एक सेट गमावल्यानंतर 17.21, 21.11, 21.19 असा विजय मिळवला आहे. तर सिंधूचा आता या चिनी प्रतिस्पर्ध्याविरुद्ध 3.0 असा विक्रम आहे. (Singapore Badminton Open)

मे महिन्यात झालेल्या थायलंड ओपननंतर सिंधूने प्रथमच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्सपूर्वी ती जेतेपद पटकावते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पीव्ही सिंधूचा आता सायना कवाकामी सोबत सामना होणार आहे. जपानच्या या खेळाडूने थायलंडच्या सहाव्या मानांकित पोर्नपावी चोचुवाँगचा 21.17, 21.19 अशा फरकाने पराभव करत सर्वांना मोठा धक्का दिला आहे. सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि एचएस प्रणॉय हे देखील संध्याकाळी उपांत्यपूर्व फेरीमध्ये खेळणार आहेत.

जागतिक क्रमवारीत 19 व्या स्थानावर असलेल्या सिंधूला पहिल्या गेममध्ये खूप अडचणीचा सामना करावा लागला पण ती बचावात्मक गेममध्ये मागे पडली पण दुसऱ्या गेममध्ये पुनरागमन करत ब्रेकपर्यंत तीन गुणांची आघाडी देखील घेतली. ब्रेकनंतर क्रॉसकोर्टवरील विजेत्याने सात गुणांसह बरोबरी केली आणि तिसर्‍या गेममध्ये सामना खूपच रोमांचक झाला पण पीव्ही सिंधूने संयमी खेळ करत विजय मिळवला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao Municipal Council: उघड्यावर शौच केल्यास होणार दंडात्मक कारवाई; स्वच्छतेच्या बाबतीत मडगाव पालिकेची नोटीस

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT