MS Dhoni | Hardik Pandya Dainik Gomantak
क्रीडा

Hardik Pandya: 'धोनी गेल्यापासून ती जबाबदारी माझ्यावर...' पंड्याचं मोठं वक्तव्य

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यानंतर हार्दिक पंड्याने त्याच्या फलंदाजीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

India vs New Zealand 3rd T20I: बुधवारी भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात 168 धावांनी विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या तिसऱ्या टी20 सामन्यात भारताकडून शुभमन गिलने शतकी खेळी केली, तसेच हार्दिक पंड्याने अष्टपैलू कामगिरी करत विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.

या सामन्यात पंड्याने फलंदाजी करताना 17 चेंडूत 30 धावांची खेळी केली. ही खेळी करताना त्याने शुभमन गिलबरोबर 103 धावांची भागीदारीही केली. या भागीदारीत गिलच्या ७१ धावांचा वाटा होता. तसेच पंड्याने गोलंदाजी करताना 16 धावा देत 4 विकेट्सही घेतल्या.

दरम्यान, त्याच्या फलंदाजीत आलेल्या बदलाबद्दल त्याने सामन्यानंतर भाष्य केले आहे. पंड्याने दुखापतीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यापासून गेल्या एक वर्षात संयमी फलंदाजी केली आहे.

याबद्दल बोलताना पंड्या म्हणाला की 'मला षटकार मारायला आवडतात. पण हेच आयुष्य आहे. मला विकसित व्हायचे आहे. माझा भागीदारी करण्यावर विश्वास आहे. मला माझ्या साथीदार फलंदाजाला आणि माझ्या संघाला हा विश्वास द्यायचा असतो की मी इथे आहे.'

'मी या संघात असलेल्या इतर खेळाडूंपेक्षा अधिक सामने खेळलो आहे. मी आता दबाव स्विकारणे आणि तो घालवणे शिकलो आहे. मी सर्वकाही शांततेत होईल याकडे लक्ष देतो. कदाचीत मला माझा स्ट्राईक रेट कमी करावा लागला असेल. नवीन भूमिका निभावण्याची नेहमीच मला उत्सुकता असतो.'

तसेच हार्दिक असेही म्हणाला की पुढे येऊन संघासाठी कामगिरी करावी असे त्याला वाटते. त्याचबरोबर सध्या हार्दिक फिनिशरची भूमिकाही भारतीय संघासाठी निभावताना दिसतो. यापूर्वी ही भूमिका बराच काळ माजी कर्णधार एमएस धोनीने निभावली होती.

(Since MD Dhoni is gone, all of a sudden responsibility is onto me says Hardik Pandya)

याबद्दल हार्दिक म्हणाला, 'मला खाली येऊन धोनीची होती ती भूमिका निभावण्यासही काही समस्या नाही. त्यावेळी मी युवा होतो आणि मैदानावर फटकेबाजी करायचो. पण तो निवृत्त झाल्यापासून अचानक ती जबाबदारी माझ्यावर आली, मला त्याची काही समस्या नाही. आम्हा परिणाम मिळत आहेत आणि जरी मला थोड्या धीम्या गतीने खेळावे लागले तरी ठीक आहे.'

धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाने बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध तिसरा टी२० सामना जिंकून मालिकेत २-१ असा विजय मिळवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

Goa Crime: भाडेकरुनेच केला मालकाचा आणि मित्राचा खून? दुहेरी हत्याकांडाने हादरले साळीगाव! पोलिसांकडून तपास सुरु

Illegal Betting Case: ईडीची मोठी कारवाई! सुरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 कोटींची संपत्ती जप्त; 'वन एक्स बेट'चा प्रमोशन करार पडला महागात

ट्रेनमध्ये भारतीय जवानाचा खून; चादरच्या वादातून साबरमती एक्सप्रेसमध्ये घडली घटना

"... म्हणून मी मांसाहार सोडला", आरोग्यमंत्री विश्वजित राणेंचा भावनिक खुलासा; Watch Video

SCROLL FOR NEXT