Shubman Gill | Rohit Sharma | Ishan Kishan Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ: ...म्हणून शुभमन गिल ईशान किशनला घालतो शिव्या, स्वत:च केलाय खुलासा; Video Viral

शुभमन गिलने ईशान किशनबरोबरील सामन्यापूर्वीचा एक किस्सा शेअर केला आहे.

Pranali Kodre

India vs New Zealand: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात 12 धावांनी विजय मिळवला. भारताच्या या विजयात सलामीवीर शुभमन गिलने द्विशतक करत महत्त्वाचे योगदान दिले. दरम्यान, सामन्यानंतर गिलबरोबर भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी चर्चा केली.

गिल वनडेमध्ये द्विशतक करणारा भारताचा पाचवा क्रिकेटपटू आहे. या पाच क्रिकेटपटूंमध्ये रोहित आणि ईशान यांचाही समावेश असल्याने त्यांनी वनडे द्विशतक करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या क्लबमध्ये गिलचे स्वागत केले.

या तिघांच्या चर्चेदरम्यान गिल आणि ईशान यांच्यातील घट्ट मैत्रीचाही गमतीशीर किस्सा ऐकायला मिळाला. त्याच्यातील चर्चेचा व्हिडिओ बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर शेअर केला आहे.

(Shubman Gill Shares why he gets irritated by Ishan Kishan)

या व्हिडिओमध्ये दिसते की रोहित जेव्हा गिलशी त्याच्या द्विशतकाबद्दल चर्चा करत असतो, त्यावेळी तिथे ईशानही आहे. त्यामुळे रोहित गिलला म्हणतो हा इथे का उभा आहे. त्यावेळी ईशान सांगतो की 'मला गिलला एक प्रश्न विचारायचा आहे की तो सामन्याच्या आधी काय करतो.'

त्यावर रोहित म्हणतो, 'तुम्ही दोघे एकत्र रहाता, हेच सामन्याच्या आधीचे रुटीन आहे.' त्यानंतर गिल सांगतो की 'हा (ईशान) सामन्याआधी मला झोपून देत नाही. त्याला आयपॅडवर आवाज मोठा करून चित्रपट पाहायचा असतो आणि त्याला आयपॉडही कानात घालायचे नसतात. मग मी त्याला शिव्या देऊन सांगतो की आवाज कमी कर, आयपॉड घाल. तर तोच मला सांगतो, की मी त्याच्या खोलीत झोपलोय. सर्व त्याच्याच मर्जीने चालेल. आमची रोज भांडणं होतात. हेच आमचे रुटीन आहे.'

गिलने हा किस्सा सांगितल्यानंतर ईशान त्याला म्हणाला, 'तू माझ्या खोलीत झोपतो म्हणून तू आज माझ्या वाट्यातील धावाही काढल्या.' त्यानंतर रोहित सांगतो की हे दोघेही खूप चांगले मित्र आहेत आणि त्यांचे भविष्यही उज्ज्वल आहे.

गिलने बुधवारी झालेल्या सामन्यात 149 चेंडूत 208 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 19 चौकार आणि 9 षटकार मारले. त्याच्यानंतर भारताच्या डावात सर्वाधिक 34 धावांची खेळी रोहितने केली होती. गिलव्यतिरिक्त कोणत्याही भारतीय फलंदाजाने 50 धावांचा टप्पा ओलांडला नव्हता. त्यामुळे भारताला 50 षटकात 8 बाद 349 धावाच करता आल्या

याबद्दलही रोहितने गिलला प्रश्न विचारला होता. त्यावर गिल म्हणाला, 'मला द्विशतकाबद्दल छान वाटत आहे. गेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत मी दोन्ही सामन्यात शतक केल्यानंतर लगेच बाद झालो. पण या सामन्यातही मी शतक केले. त्यामुळे माझ्याकडे एक संधी होती मोठी खेळी करण्याची आणि मला चांगले वाटले की ती झाली.'

'मी खेळीवेळी फार विचार करत नव्हतो. पण जेव्हा समोरून विकेट्स जात होत्या, तेव्हा एवढंच डोक्यात होतं की गोलंदाज जर दबावात नसेल, तर तो निर्धाव चेंडू टाकू शकतो. त्यामुळे गोलंदाजाला असे वाटले पाहिजे की हा खेळाडू चौकार मारण्याचाही प्रयत्न करत आहे. तो फक्त एक धावेचा किंवा निर्धाव चेंडू खेळण्याचा प्रयत्न करत नाहीये.'

व्हिडिओ पाहाण्यासाठी क्लिक करा

दरम्यान, भारताकडून आत्तापर्यंत गिलव्यतिरिक्त सचिन तेंडुलकर (200*), विरेंद्र सेहवाग (219), रोहित शर्मा (209, 208*, 264) आणि ईशान किशन (210) यांनी द्विशतके केली आहेत.

न्यूझीलंडला 12 धावा पडल्या कमी

दरम्यान, न्यूझीलंडने 350 धावांचा पाठलाग करताना 49.2 षटकात सर्वबाद 337 धावा केल्या. न्यूझीलंडकडून मायकल ब्रेसवेलने 140 धावांची खेळी केली, तर मिशेल सँटेनरने 57 धावा केल्या. तसेच फिन ऍलेनने 40 धावांची खेळी केली. पण, त्यांना विजय मिळवून देता आला नाही. भारताकडून घरच्या मैदानावर खेळणाऱ्या मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'पक्षात यायचं तर दरवाजे उघडे आहेत', भाजप प्रदेशाध्यक्षांनी उडवली खिल्ली; काँग्रेसच्या रणनीतीला दिलं झणझणीत उत्तर

IND vs SA: कसोटी मालिकेत टीम इंडियाचा सूपडा साफ! व्हाईटवॉशनंतर गौतम गंभीरला म्हणाला, 'पराभवाची जबाबदारी सगळ्यांची...'

WTC Points Table: भारताच्या 'क्लिन स्वीप'चा पाकिस्तानला फायदा, WTC पॉइंट टेबलमध्ये उलटफेर; दक्षिण आफ्रिकेने मारली बाजी

रस्ते खोदाल तर याद राखा!! PM मोदींच्या दौऱ्यासाठी दक्षिण गोव्यात रस्ते खोदकामावर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल

Baina Dacoity: 6वा मजला, 6 दिवस, 6 आरोपी! 'गोवा पोलिसांनी करून दाखवलं'; बायणा दरोडा प्रकरणी पीडित कुटुंबाला मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT