Shubman Gill BCCI
क्रीडा

IND vs NZ, Semi-Final: शतकाजवळ असणारा गिल अचानक का परतला ड्रेसिंग रुममध्ये, नक्की काय घडलं?

Shubman Gill: शतकाच्या जवळ असताना गिलला अचनाक मैदानातून बाहेर जावे लागले होते.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs New Zealand Semi-Final, Shubman Gill Retired Hurt:

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना बुधवारी खेळला जात आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना होत आहे. हा सामना सुरु असतानाच भारताला मोठा धक्का बसला आहे. शुभमन गिलला अचानक मैदानातून बाहेर जावे लागले.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे रोहित शर्मा आणि शुभमन गिल सलामीला फलंदाजीला आले होते. त्यांनी आक्रमक खेळत चांगली सुरुवातही केली. पण 9 व्या षटकार रोहित 47 धावांवर बाद झाला. त्यानंतरही विराट कोहलीने गिलला चांगली साथ दिली होती.

मात्र, 23 वे षटक सुरू असताना गिलला मुंबईतील उष्णतेचा आणि उन्हाचा त्रास होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे त्याच्या पायात क्रॅम्पही आल्याचे दिसले. त्यामुळे फिजिओ मैदानात आले. पण गिलला नंतर फलंदाजी करता न आल्याने तो या षटकाच्या चौथ्या चेंडूनंतर मैदानातून बाहेर गेला. त्यावेळी तो 65 चेंडूत 79 धावांवर खेळत होता.

या खेळीदरम्यान त्याने 8 चौकार आणि 3 षटकार मारले होते. दरम्यान, गिल रिटायर्ड हर्ट झाल्याने श्रेयस अय्यर फलंदाजीला आला. नंतर विराट आणि श्रेयसने भारताचा डाव सांभाळला.

दरम्यान, गिलच्या तब्येतीबद्दल बीसीसीआयने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

पहिल्या उपांत्य सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

  • न्यूझीलंड - डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विलियम्सन (कर्णधार), डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), मिचेल सँटेनर, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant: तांबोशे झाले आता उगवे! 'ओंकार'मुळे शेतकरी त्रस्त; भातशेती, केळी, पोफळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Goa Politics: '2027 मध्ये भाजपचे 27 आमदार येणारच'! मुख्यमंत्र्यांचा ठाम विश्वास; तेंडुलकरांचे केले कौतुक

Goa Tourist: हुर्रे! 6 महिन्यांत 5.45 लाख पर्यटक; नव्या फ्लाईट्स, क्रूझमुळे फुलले पर्यटन

Goa Live Updates: कोलव्यात क्लिनिकला आग

Goa Tourism: बाईक रेंट कमी, शॅक उभारणी! गोव्‍यासमोर महाराष्‍ट्र, कर्नाटकचे आव्‍हान; पर्यटनक्षेत्रात वाढली स्पर्धा

SCROLL FOR NEXT