Shubman Gill
Shubman Gill  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: शुभमन गिलने मोडला सेहवागचा महा रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला फलंदाज!

Manish Jadhav

IPL 2023: टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिलने शुक्रवारी गुजरात टायटन्ससाठी आपल्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी खेळली. शुक्रवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या क्वालिफायर-2 सामन्यात शुभमन गिलने 60 चेंडूत 129 धावांची वादळी खेळी खेळली.

गिलने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 10 षटकार मारले. आपल्या विस्फोटक खेळीत त्याने अनेक मोठे विक्रम मोडीत काढले. आयपीएलच्या इतिहासात गिलने वीरेंद्र सेहवागचा मोठा विक्रम मोडला. अशी कामगिरी करणारा शुभमन गिल हा भारताचा पहिला फलंदाज ठरला.

शुभमन गिलने वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडला

शुभमन गिलने शुक्रवारी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या (Mumbai Indians) क्वालिफायर-2 सामन्यात केलेल्या शतकासह आयपीएल 2023 मध्ये एकूण 3 शतके पूर्ण केली आहेत. गिलने या आयपीएल हंगामात सर्वाधिक 851 धावा केल्या आहेत. त्याच्याकडे आता ऑरेंज कॅप देखील आहे.

दरम्यान, शुभमन गिलने आयपीएलच्या इतिहासात वीरेंद्र सेहवागचा मोठा विक्रम मोडीत काढला. शुभमन हा IPL प्लेऑफच्या इतिहासातील सर्वात मोठी वैयक्तिक खेळी खेळणारा फलंदाज ठरला आहे. या एपिसोडमध्ये त्याने भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडला.

अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने आयपीएल 2014 मध्ये पंजाब किंग्जकडून खेळताना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध क्वालिफायर-2 सामन्यात प्लेऑफ टप्प्यातील सर्वात मोठी वैयक्तिक खेळी खेळली होती.

वीरेंद्र सेहवागने आयपीएल 2014 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या क्वालिफायर-2 सामन्यात 122 धावांची वैयक्तिक खेळी खेळली होती.

शुक्रवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध शुभमन गिलने वीरेंद्र सेहवागचा तोच विक्रम मोडला आणि 129 धावांची तूफानी खेळी खेळली. गिल हा IPL प्लेऑफमध्ये शतक झळकावणारा (23 वर्षे आणि 260 दिवस) सर्वात तरुण फलंदाज आहे.

सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसरा

क्वालिफायर-2 मध्ये शतक झळकावून शुभमन गिल आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.

विराट कोहली (Virat Kohli) आणि जोस बटलर एका मोसमात 4-4 शतके झळकावून या यादीत अव्वल स्थानावर आहेत.

शुभमन गिलने IPL 2023 च्या 16 सामन्यांमध्ये 156.43 च्या स्ट्राइक रेटने 851 धावा केल्या आहेत, ज्यात 78 चौकार आणि 33 षटकारांचा समावेश आहे.

गिलने IPL 2023 मध्ये 3 शतके आणि 4 अर्धशतके झळकावली आहेत. शुभमन गिलचा IPL 2023 मधील सर्वोत्तम धावसंख्या 129 धावा आहे.

आयपीएल प्लेऑफमधील सर्वात मोठ्या वैयक्तिक खेळीचा विक्रम

शुभमन गिल (GT)- 129 वि मुंबई इंडियन्स, अहमदाबाद, 2023 (क्वालिफायर-II)

वीरेंद्र सेहवाग (PBKS) - 122 वि चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई, 2014 (क्वालिफायर-II)

शेन वॉटसन (CSK) - 117* वि सनरायझर्स हैदराबाद, मुंबई, 2018 (अंतिम)

वृद्धिमान साहा (पीबीकेएस) - 115* वि कोलकाता नाइट रायडर्स, बंगळुरु, 2014 (अंतिम)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘’प्रमोद सावंत सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, त्यांच्या 1000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा’’; अलका लांबा यांचा हल्लाबोल

Ranbir Alia Video: रणबीरच्या मुंबई सिटीकडून गोव्याचा पराभव, आलियासोबत विजयी जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल

Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजीच्या खोदकामात आढळली रहस्यमय मूर्ती

Kala Academy: गोविंद गावडे कोणाला वाचवत आहेत? सल्लागाराकडे दाखवले बोट

Economic Crisis: पाकिस्तानचा कैवारी बनणाऱ्या देशाला वाढत्या महागाईनं ग्रासलं; दोन वेळच्या अन्नासाठी जनता करतेय संघर्ष!

SCROLL FOR NEXT