Ranbir Alia Video: रणबीरच्या मुंबई सिटीकडून गोव्याचा पराभव, आलियासोबत विजयी जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल

Mumbai City FC Vs Goa FC ISL Match: मुंबई सिटीने घरच्या मैदानावर दुसऱ्या टप्प्यात एफसी गोवा संघावर 2-0 असा विजय नोंदवला.
Ranbir Alia Video
Ranbir Alia VideoSocial Media

Mumbai City FC Vs Goa FC ISL Match

एफसी गोवा संघ इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेतील करंडकाच्या उपांत्य फेरीतील पहिल्या टप्प्यातील पराभवातून सावरूच शकला नाही. त्याचा फायदा घेत मुंबई सिटीने घरच्या मैदानावर सोमवारी रात्री दुसऱ्या टप्प्यात 2-0 असा विजय नोंदवत एकंदरीत 5-2 या गोल सरासरीसह अंतिम फेरीत प्रवेश केला.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी सोमवारी संध्याकाळी या फुटबॉल सामन्याचा आनंद लुटला. रणबीर कपूर मुंबई सिटी एफसीचा सह-संघमालक आहे.

मुंबई सिटीने विजय मिळवल्यानंतर मैदानावर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट जल्लोष करतानाचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. रणबीर कपूर 2014 पासून मुंबई सिटी एफसीशी जोडला गेला आहे. त्याच्याशिवाय बिमल पारेख हे देखील या संघाचे मालक आहेत.

Ranbir Alia Video
Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजीच्या खोदकामात आढळली रहस्यमय मूर्ती

सोमवारी सामन्याच्या उत्तरार्धात मुंबई सिटीने दोन गोल नोंदवून एफसी गोवा संघ चमत्कार घडविणार नाही याची दक्षता घेतली. फातोर्डा येथे गेल्या बुधवारी (ता. २४) मुंबई सिटीने ०-२ पिछाडीवरून एफसी गोवाला ३-२ असा पराभवाचा हादरा दिला होता.

ही पिछाडी भरून काढणे एफसी गोवासाठी सामना जिंकणे आवश्यक होते, परंतु मुंबई सिटीच्या वेगवान खेळासमोर त्यांची डाळ शिजली नाही. पूर्वार्धात यजमान संघाचे काही प्रयत्न वाया गेले. त्यानंतर ६९व्या मिनिटास होर्गे परेरा दियाझ याने गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com