Shubman Gill Scored 3rd ODI Century  Dainik Gomantak
क्रीडा

India vs New Zealand: शुभमन गिलची बॅक टू बॅक सेंच्यूरी! कोहली-धवनचा रेकॉर्डही मोडला

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत शुभमन गिलने शतक करताना मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Pranali Kodre

Shumbman Gill: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात बुधवारी वनडे मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला वनडे सामना हैदराबादमध्ये झाला. या सामन्यादरम्यान भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिलने शतकी खेळी केली आहे. त्याने हे शतक करताना मोठ्या विक्रमालाही गवसणी घातली आहे.

त्याने 87 चेंडूत त्याचे हे शतक पूर्ण केले. हे त्याचे सलग दुसरे तर एकूण वनडे क्रिकेटमधील तिसरे शतक ठरले आहे. त्याने केवळ 19 वनडे डावात तीन शतके केली आहेत. वनडेमध्ये 19 किंवा त्यापेक्षा डावांपेक्षा कमी डावात 3 शतके करणारा तो दुसराच भारतीय फलंदाज आहे. यापूर्वी शिखर धवनने 17 डावांमध्ये तीन वनडे शतके झळकावली होती.

गिल एक हजारी

गिलने वनडेमध्ये 1000 धावाही पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे तो वनडेत सर्वात जलद 1000 धावा करणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे.

त्याने या यादीत पाकिस्तानचा फलंदाज इमाम-उल-हकची बरोबरी केली आहे. इमामनेही 19 डावात 1000 वनडे धावा पूर्ण केल्या होत्या. या यादीत अव्वल क्रमांकावर फखर जमान आहे. त्याने 18 डावात 1000 वनडे धावा पूर्ण केल्या होत्या.

तसेच गिल सर्वात जलद 1000 वनडे धावा करणारा भारतीय फलंदाजही ठरला आहे. त्याने या यादीत विराट कोहली आणि शिखर धवन यांना मागे टाकले आहे. विराट आणि शिखर यांनी 24 डावात 1000 वनडे धावांचा टप्पा पार केला होता.

(Shubman Gill become Fastest Indian batter to score 1000 ODI runs)

शुभमन गिलची शतके

शुभमन गिलने यापूर्वी 22 ऑगस्ट 2022 रोजी झिम्बाब्वे विरुद्ध हरारेमध्ये झालेल्या वनडे सामन्यांत 130 धावांची खेळी केलेली. तसेच त्याने 15 जानेवारी रोजी तिरुअनंतपुरम येथे श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सामन्यांत 116 धावांची खेळी केली होती.

रोहित-सुर्यकुमारबरोबर अर्धशतकी भागीदारी

गिलने तिसरे वनडे शतक करताना कर्णधार रोहित शर्माबरोबर सलामीला 60 धावांची आणि सूर्यकुमारबरोबर चौथ्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताने 35 षटकांतच 200 धावांचा टप्पा पार केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Third District: नवा तिसरा जिल्हा आणि मुख्यालय; काब्राल यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार का मानले? काँग्रेस आमदाराचा सवाल

Goa Assembly Live: ज्या डिलिव्हरी बॉईजची बाईक गोव्यात नोंदणीकृत नाही; त्याचीही पडताळणी करा, दिलायला लोबो यांची मागणी

IND vs ENG: सर जडेजा पुन्हा रचणार इतिहास! व्हीव्हीएस लक्ष्मणचा रेकॉर्ड निशाण्यावर; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Mangalagaur 2025: केळीचे मखर, सोळा दिवे अन् अलंकार; वाचा गोव्यात कशी साजरी होते 'अनोखी मंगळागौर'

Green Tax: हरित करावरुन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मुख्यमंत्री सावंतांना घेरले; CM म्हणाले, 'नंतर उत्तर देऊ'

SCROLL FOR NEXT