Shreyas Iyer Dainik Gomantak
क्रीडा

श्रेयस अय्यरचा मोठा खुलासा, 'हे' काम करण्यासाठी बुमराहला लाच देण्याचा केला प्रयत्न

श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka) तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत हे खेळाडू अनुपस्थित आहेत.

दैनिक गोमन्तक

श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत अनुपस्थित आहेत. अशा परिस्थितीत श्रेयस अय्यरवर मिडल ऑर्डरची मोठी जबाबदारी आहे. श्रेयसला (Shreyas Iyer) T20 विश्वचषक 2021 च्या संघात स्थान मिळाले नाही. त्यामुळे आता त्याला शानदार कामगिरी करण्याची आणि या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात (Australia) खेळल्या जाणाऱ्या T20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) साठी संघात स्थान अढळ करण्याची मोठी संधी आहे. (Shreyas Iyers Big Revelation)

दरम्यान, श्रेयस अय्यरला आयपीएल फ्रँचायझी KKR चा कर्णधार बनवण्यात आले आहे. सध्या अय्यरला भारतीय संघात T20 सामन्यांमध्ये कोहलीच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी देण्यात आली आहे. श्रीलंकेविरुद्धही त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत 28 चेंडूत नाबाद 57 धावा करुन भारतीय संघाची धावसंख्या 199 पर्यंत घेऊन गेला होता. त्यानंतर भारताने हा सामना 62 धावांनी जिंकला.

तसेच, या सामन्यातील भारताच्या विजयानंतर श्रेयस अय्यरने एका घटनेचा उल्लेख केला आहे. ज्यामध्ये त्याने म्हटले की, या सामन्याच्या शेवटच्या षटकांमध्ये मी बॉल स्विंग करण्यासाठी उत्सुक होतो. त्यावेळी मी टीम इंडियाचा (Team India) उपकर्णधार जसप्रीत बुमराहला विचारले होते. त्याला पटवून देण्याचा प्रयत्नही केला होता.

शिवाय, श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील शेवटच्या काही षटकांमध्ये रोहित शर्मा मैदानाबाहेर होता. त्यावेळी जसप्रीत बुमराहने (Jaspreet Bumrah) शेवटपर्यंत टीम इंडियाची कमान संभाळली होती. भारताने या सामन्यात पाच आघाडीच्या गोलंदाजांसह 7 गोलंदाजांचा संघात स्थान दिले होते. दीपक हुडा (Deepak Hooda) आणि व्यंकटेश अय्यर यांनाही या सामन्यात काही षटके टाकायला मिळाली. मात्र, श्रेयस अय्यरला गोलंदाजीची संधी मिळाली नाही. गेल्या महिन्यात केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने तीन षटके टाकली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गोवा सरकारचा मोठा निर्णय; चार कनिष्ठ अधिकाऱ्यांची सेवा केली समाप्त!

Hong Kong Fire Video: हाँगकाँगमध्ये भीषण आग! 65 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती; धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Viral Video: 75 वर्षांच्या आजीबाईचा डान्स फ्लोअरवर तहलका, सोशल मीडियावर जबरदस्त डान्स व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "वाह आजी क्या बात है!"

WPL Auction 2026: वर्ल्ड कपमध्ये 2 शतके, 299 धावा! विश्वविक्रमी कामगिरी करुनही ऑस्ट्रेलियाची 'ही' स्टार खेळाडू राहिली 'अनसोल्ड'

ZP निवडणूक वेळेवरच! आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

SCROLL FOR NEXT