Shreyas Iyer Dainik Gomantak
क्रीडा

Shreyas Iyer: 'शतक त्यांच्यासाठी जे...', ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'मॅन ऑफ द मॅच' जिंकलेल्या अय्यरची पोस्ट व्हायरल

IND vs AUS: श्रेयस अय्यरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक केल्यानंतर सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.

Pranali Kodre

Shreyas Iyer Social Media Post After Winning Man of the Match in India vs Australia 2nd ODI at Indore :

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ९९ धावांनी विजय मिळवला. इंदूरला झालेल्या या सामन्यातील भारताच्या विजयात श्रेयस अय्यरने शतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. त्यानंतर त्याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

श्रेयस अय्यरने ९० चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांसह १०५ धावांची खेळी केली. तसेच शुभमन गिलबरोबर दुसऱ्या विकेटसाठी २०० धावांची भागीदारी केली. गिलनेही १०४ धावांची खेळी केली. श्रेयसला त्याच्या या खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

दरम्यान, या सामन्यानंतर श्रेयसने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये हे शतक त्याला पाठिंबा देणाऱ्या लोकांना समर्पित केले आहे. त्याने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये ब्लॅक अँड व्हाईट बॅकग्राऊंड असलेला त्याचा शतक केल्यानंतरचा फोटो शेअर केला आहे. तसेच त्याने लिहिले की 'त्यासर्वांसाठी, जे माझ्या पाठीशी उभे राहिले.'

खरंतर श्रेयस अय्यर या मालिकेपूर्वी बराच काळ क्रिकेटपासून पाठीच्या दुखापतीमुळे दूर होता. त्याच्या पाठीवर एप्रिलमध्ये शस्त्रक्रियाही करण्यात आली.

त्यानंतर त्याने या महिन्याच्या सुरुवातीला आशिया चषकातून पुनरागमन केले होते, पण त्यानंतर पुन्हा वेदना झाल्याने तो संघातून बाहेर झालेला. पण, आता पुन्हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याने पुनरागमन केले, तसेच त्याने हे शतक करत तो पूर्ण फिट असल्याचे सिद्ध केले आहे.

दरम्यान, इंदूरला झालेल्या वनडेत श्रेयस आणि शुभमन यांनी केलेल्या शतकानंतर केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतके केली. केएल राहुलने ५२ धावांची आणि सूर्यकुमार यादवने नाबाद ७२ धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकाच ५ बाद ३९९ धावा केल्या होत्या.

त्यानंतर पावसामुळे ऑस्ट्रेलियासमोर डकवर्थ लुईस नियमानुसार ३३ षटकात ३१७ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. पण ऑस्ट्रेलियाचा संघ २८.२ षटकात २१७ धावांवर सर्वबाद झाला.

ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने ५३ धावांची खेळी केली, तसेच सीन ऍबॉटने ५४ धावांची खेळी केली, त्याने आणि जोश हेजलवूडने ९ व्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी केली. पण त्यांना ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत पोहचवण्यात अपयश आले. ऑस्ट्रेलियाचा संघ २८.२ षटकात २१७ धावांवर सर्वबाद झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT