Shreyas Iyer  Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: श्रेयस अय्यरची करिष्माई खेळी; वर्ल्ड कपमधील सलग दुसरे शतक झळकावत मोडले अनेक रेकॉर्ड!

Manish Jadhav

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने धावांचा डोंगर उभारला.

भारताने चार विकेट्सच्या मोबदल्यात 397 धावा केल्या. म्हणजेच न्यूझीलंडला विजयासाठी 398 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. या उपांत्य फेरीच्या सामन्यात विराट कोहलीनंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या श्रेयस अय्यरनेही शानदार शतक झळकावले.

श्रेयसने फक्त 70 चेंडूत 105 धावा केल्या, ज्यात आठ षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता. चालू विश्वचषकात श्रेयसचे हे सलग दुसरे शतक ठरले. यापूर्वी, त्याने नेदरलँड्सविरुद्ध शतकी खेळी (128*) खेळली होती.

दरम्यान, श्रेयस आता कोणत्याही विश्वचषक सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज बनला आहे. श्रेयसने सौरव गांगुली आणि युवराज सिंगला मागे सोडले, ज्यांनी प्रत्येकी 7 षटकार ठोकले होते.

एवढेच नाही तर सेमीफायनलमध्ये भारतासाठी (India) सर्वात मोठी धावसंख्या बनवण्याच्या बाबतीत श्रेयस दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. श्रेयस अय्यरने सौरव गांगुलीला मागे टाकले. गांगुलीने 2003 मध्ये केनियाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात 111 धावा केल्या होत्या.

वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. कोहलीने आज (15 नोव्हेंबर) हा विक्रम केला आहे.

श्रेयस अय्यरने यंदाच्या विश्वचषकात 500 हून अधिक धावा पूर्ण केल्या

श्रेयस अय्यरने आता एकदिवसीय विश्वचषकात 500 हून अधिक धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना 500 हून अधिक धावा करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

यापूर्वी 2007 च्या विश्वचषकात न्यूझीलंडच्या स्कॉट स्टायरिसने 499 धावा केल्या होत्या. तर 2015 च्या विश्वचषकात एबी डिव्हिलियर्सने 482 धावा केल्या होत्या. 2019 च्या विश्वचषकात इंग्लंडच्या बेन स्टोक्सने 465 धावा केल्या होत्या.

एवढेच नाही तर आता विश्वचषकाच्या बाद फेरीत भारतासाठी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रमही विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्या नावावर झाला आहे. आजच्या सामन्यात विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी 163 धावांची भागीदारी केली.

याआधी 2015 च्या विश्वचषकात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि सुरेश रैना यांनी बांगलादेशविरुद्ध उपांत्य फेरीत 122 धावांची भागीदारी केली होती.

2019 विश्वचषक उपांत्य फेरीत एमएस धोनी आणि रवींद्र जडेजा यांनी मिळून भारतीय संघासाठी 116 धावांची भागीदारी केली. पण आता या यादीत विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांची नावे आघाडीवर आली आहेत.

विश्वचषक सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणारे भारतीय फलंदाज:

8 - श्रेयस अय्यर वि. न्यूझीलंड, मुंबई 2023

7 - सौरव गांगुली विरुद्ध श्रीलंका, टॉंटन, 1999

7 - युवराज सिंग विरुद्ध बर्म्युडा, पोर्ट ऑफ स्पेन, 2007

6 - कपिल देव विरुद्ध झिम्बाब्वे, टुनब्रिज वेल्स 1983

6 - रोहित शर्मा विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद 2023

6 - श्रेयस अय्यर विरुद्ध श्रीलंका, मुंबई 2023

विश्वचषक उपांत्य फेरीतील भारतासाठी सर्वाधिक धावसंख्या:

117- विराट कोहली विरुद्ध न्यूझीलंड, 2023

105- श्रेयस अय्यर विरुद्ध न्यूझीलंड, 2023

111*- गांगुली विरुद्ध केनिया, 2003

85- सचिन तेंडुलकर विरुद्ध पाकिस्तान, 2011

83- सचिन तेंडुलकर विरुद्ध केनिया, 2003

77- रवींद्र जडेजा विरुद्ध न्यूझीलंड, 2019

65- सचिन तेंडुलकर विरुद्ध श्रीलंका, 1996

65- एमएल धोनी विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2015

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT