Shreyas Iyer Century Dainik Gomantak
क्रीडा

Shreyas Iyer Century: अय्यरचा 'सरपंच' स्वॅग! 51 चेंडूत ठोकलं ऐतिहासिक शतक; IPL च्या इतिहासात पहिल्यांदाच घडला 'असा' चमत्कार

Shreyas Iyer 51 ball century: आयपीएल २०२६ (IPL 2026) मधील अत्यंत चुरशीच्या आणि महत्त्वाच्या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याने आपल्या बॅटीने मैदानावर अक्षरशः आग ओकली.

Sameer Amunekar

आयपीएल २०२६ (IPL 2026) मधील अत्यंत चुरशीच्या आणि महत्त्वाच्या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याने आपल्या बॅटीने मैदानावर अक्षरशः आग ओकली. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळताना त्याने केवळ आपल्या संघाला अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला नाही, तर आयपीएलच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले.

लखनऊच्या इकाना स्टेडियमवर पंजाबसमोर विजयासाठी मोठे आव्हान होते. डावाची सुरुवात अत्यंत खराब झाली आणि अवघ्या २२ धावांवर संघाने २ महत्त्वाचे गडी गमावले. अशा गंभीर परिस्थितीत कर्णधार श्रेयस मैदानात उतरला आणि त्याने ५१ चेंडूत १०१ धावांची वादळी शतकी खेळी साकारली. या खेळीत त्याने ११ चौकार आणि ५ गगनचुंबी षटकार ठोकले.

आयपीएलच्या इतिहासात नवा विक्रम

या शतकी खेळीसह श्रेयस अय्यरने आयपीएलच्या इतिहासात एका अभूतपूर्व विक्रमाची नोंद केली आहे. आयपीएलमध्ये चौथ्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन शतक झळकावणारा तो पहिलाच कर्णधार ठरला आहे. यापूर्वी १६ वेळा कर्णधारांनी शतके झळकावली होती, मात्र ते सर्व टॉप-३ मध्ये फलंदाजी करत होते.

याशिवाय, आयपीएलमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना (Run Chase) शतक ठोकणारा तो चौथा कर्णधार बनला आहे. यापूर्वी हा पराक्रम केवळ विराट कोहली, संजू सॅमसन आणि वीरेंद्र सेहवाग यांनी केला होता. पंजाब किंग्ससाठी लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना शतक ठोकणारा तो पहिलाच कर्णधार आहे.

प्लेऑफच्या आशा जिवंत; श्रेयस भावुक

पंजाब किंग्सने श्रेयसच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत सात वेळा १९० हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला असून, या सर्व सामन्यांमध्ये श्रेयसने अर्धशतके झळकावली आहेत. परंतु, हे शतक त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिलेच शतक असल्याने आणि संघ अडचणीत असताना आल्यामुळे अत्यंत खास ठरले.

लागोपाठ ६ पराभवांचा सामना केल्यानंतर मिळालेल्या या विजयामुळे पंजाबच्या प्लेऑफच्या आशा पुन्हा जिवंत झाल्या आहेत. सामन्यानंतर श्रेयस भावुक होत म्हणाला, "हे शतक अगदी योग्य वेळी आले आहे. जेव्हा तुम्ही सामना जिंकवून नाबाद शतक झळकावता, तेव्हा ते कोणत्याही फलंदाजासाठी एका स्वप्नासारखे असते. आता आमचे पूर्ण लक्ष मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पुढील सामन्यावर असेल."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Smart Meter: 'स्मार्ट मीटर'चा गोंधळ अन् सरकारची माघार: 'लोड'च्या राजकारणात जनता भरडली!

Porvorim: घरातच दबा धरुन बसला होता 'तो' राक्षस! अल्पवयीन मुलीच्या जबाबावर कोर्टानं ठेवला विश्वास; नराधम बापाला मोठा झटका

काटेरी मुकुटासारख्‍या प्रथिनांतील बदलांमुळे संसर्ग वाढला; तब्बल 1,274 जनुकीय नोंदींचा अभ्यास, डेल्टा प्रकाराचा प्रभावही स्पष्ट

VIDEO: 370 बिर्याणी वाद; प्रणित मोरेची पहिली प्रतिक्रिया, 'आता माझ्या कंटेंटमध्ये बदल दिसेल' म्हणत मागितली माफी

Goa Drowning: आनंदाचा प्रवास ठरला अखेरचा! दूधसागर नदीत बुडून 4 IIT विद्यार्थ्यांचा मृत्यू; हसत्या-खेळत्या कुटुंबावर काळाचा घाला

SCROLL FOR NEXT