Bengal Club Cricket Facebook
क्रीडा

Fixing Allegations: बंगाल क्रिकेटमध्ये फिक्सिंग? 19 वर्षांखालील वर्ल्डकप विजेत्या खेळाडूने व्हिडिओ सादर करत केले आरोप

Shreevats Goswami Fixing Allegations: बंगाल क्लब क्रिकेटमध्ये फिक्सिंग झाल्याचा आरोप माजी क्रिकेटपटूने केल्यानंतर त्याची दखल राज्य क्रिकेट असोसिएशनलाही घ्यावी लागली आहे.

Pranali Kodre

Shreevats Goswami Fixing Allegations:

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसात मोठ्या घटना घडताना दिसत आहेत. त्यातच आता बंगाल क्रिकेटमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. बंगालचा क्रिकेटपटू श्रीवत्स गोस्वामीने कोलकातामधील एका सामन्यात फिक्सिंग झाल्याचा दावा केला आहे. त्याची दखल बंगाल क्रिकेट असोसिएशनलाही घ्यावी लागली आहे.

गोस्वामी 2008 मध्ये 19 वर्षांखालील वर्ल्डकप जिंकलेल्या भारतीय संघाकडूनही खेळला होता.तो गेली अनेकवर्षे बंगालमध्ये क्रिकेट खेळतो. त्याने नुकतीच फेसबुकवर दोन व्हिडिओ पोस्ट करत फिक्सिंगची शंका व्यक्त केली आहे.

त्याच्या म्हणण्यानुसार त्या व्हिडिओतील फलंदाजी करणारा संघ प्रतिस्पर्धी संघाला मदत करण्यासाठी सहज विकेट्स गमावत आहे. श्रीवत्सच्या या दाव्यानंतर बंगाल क्रिकेट असोसिएशनने (CAB) स्पर्धेच्या समितीची बैठक बोलावली आहे.

गोस्वामीने जे व्हिडिओ शेअर केले आहेत, ते बंगाल क्लब क्रिकेटमधील सुपर डिविजनच्या मोहम्मडन स्पोर्टिंग विरुद्ध टाउन क्लब यांच्यातील सामन्याचे आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार मोहम्मडन स्पोर्टिंग संघाचे फलंदाज मुद्दामहून बाद होत होते, जेणेकरून टाऊन क्लबला पाँइंट्स मिळतील.

गोस्वामीने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की 'हा सामना बंगाल क्लब क्रिकेटमधील सुपर डिविजन सामना आहे. दोन मोठे संघ असं करत आहेत. काही अंदाज नाही, असं का होत आहे? मला हे पाहून लाज वाटत आहे.'

'मी जो खेळ खेळलो आहे, तो माझ्या हृदयाच्या जवळ आहे. मला क्रिकेट आवडते आणि बंगालमध्ये क्रिकेट खेळायलाही आवडते, पण हे पाहून माझं हृदय तुटत आहे. क्लब क्रिकेट बंगाल क्रिकेटचा आत्मा आहे, त्याला कृपया खराब करू नका. मला वाटते की आता जागे होण्याची वेळ आहे. आता मीडिया कुठे आहे.?'

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की सध्याचे बंगाल क्रिकेट असोसिएशनचे सचिव देवव्रत दास टाऊनशी संबंधित आहेत. मात्र, अद्याप त्यांनी याप्रकाराबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष स्नेहाशीष गांगुलींनी स्पर्धेच्या समितीची बैठक होणार असल्याचे सांगितले असून पंचांकडून रिपोर्टही मागितले आहेत.

या सामन्यात शाकिब हबीब गांधीच्या 223 धावांच्या खेळीच्या जोरावर टाऊन क्लबने 446 धावा केल्या होत्या. त्यानंतर मोहम्मडन स्पोर्टिंगचा संघ 9 बाद 281 धावाच करू शकला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tripurari Poornima: वाळवंटीला पूर, साखळीत त्रिपुरारी पौर्णिमेची जय्यत तयारी; नौकानयन स्पर्धेला अवकाळी पावसाची भीती?

Konkani Drama Competition: फसलेला प्रयोग, पिकिल्ली पानां तुटिल्ली मना; नाट्यसमीक्षा

Rohan Bopanna Retirement: रोहन बोपण्णा वयाच्या 45 व्या वर्षी टेनिसमधून निवृत्त, भावनिक पोस्ट करत म्हणाला, 'निरोप, पण शेवट नाही...'

Corgao Lake: हर हर महादेव! दिवाळीनिमित्य तळ्यात उभा केला भव्य किल्ला, शिवरायांचा 7 फूट पुतळा

Shreyas Iyer Injury Update: श्रेयस अय्यरच्या दुखापतीबद्दल मोठी अपडेट, 'बीसीसीआय'ने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

SCROLL FOR NEXT