Medalist in 10m Air Pistol category. Dainik Gomantak
क्रीडा

Shooting Gold Medal 2023 : नेमबाजीतील सागर भार्गवला सुवर्णपदक

शूटऑफमध्ये सागरने १०.२ शॉटची, तर सरबज्योतने ९.३ शॉटची नोंद केली. २४ शॉटच्या अंतिम लढतीत हरियानाच्या दोन्ही खेळाडूंत २३८.८ गुणांची बरोबरी झाली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Shooting Gold Medal 2023 : पणजी, गोव्यातील ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नेमबाजीतील पहिले सुवर्णपदक जिंकण्याचा मान हरियानाच्या सागर भार्गव याने प्राप्त केला.

त्याने १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात अव्वल कामगिरी साधताना आपला राज्यसहकारी आणि पॅरिस ऑलिंपिकसाठी कोटा मिळविलेला सरबज्योत सिंग याच्यावर मात केली.

शूटऑफमध्ये सागरने १०.२ शॉटची, तर सरबज्योतने ९.३ शॉटची नोंद केली. २४ शॉटच्या अंतिम लढतीत हरियानाच्या दोन्ही खेळाडूंत २३८.८ गुणांची बरोबरी झाली होती.

सेनादलाच्या सुभाष सिहाग याला २१७.३ गुणांसह ब्राँझपदक मिळाले. स्पर्धेला शुक्रवारपासून मांद्रे येथील शूटिंग रेंजवर सुरवात झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: संपूर्ण गोव्याचे, गोवेकरांच्या अस्तित्वाचे, मुलाबाळांच्या भवितव्याचे प्रश्न कोण विचारणार?

Weekly Horoscope: जाणून घ्या येणाऱ्या आठवड्यातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती; काही राशींना शुभ, तर काहींना सतर्कतेचा इशारा

Mapusa Fire Incident: म्हापशात आगीचे थैमान, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना; 3 लाखांचे नुकसान

Goa Live News: मुरगाव नगर परिषदेने सप्ताहासाठी घेतला २० कोटी रुपयांचा विमा

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

SCROLL FOR NEXT