Shoaib Malik Dainik Gomantak
क्रीडा

Shoaib Malik: शोएब मलिककडून सनाला वेडिंग गिफ्ट; टी-20 मध्ये रचला इतिहास

Shoaib Malik Major Milestone T20 Cricket: पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नाची 20 जानेवारीच्या सकाळपासूनच चर्चा आहे.

Manish Jadhav

Shoaib Malik Major Milestone T20 Cricket: पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा आज (20 जानेवारी) सकाळपासूनच सुरु आहे. शोएबने भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झापासून विभक्त होऊन पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केले. दिवसभर शोएब मलिकचे लग्न, सानिया मिर्झाशी झालेला घटस्फोट, सगळे काही सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. माध्यमांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडत असताना, दिवसअखेरीस शोएब मलिकने क्रिकेटच्या मैदानावरही मोठी कामगिरी केली. तिसरे लग्न आणि सानिया मिर्झापासून वेगळे झाल्यानंतर त्याने T20 क्रिकेटमध्ये इतिहास रचला.

शोएब मलिकचा मोठा पराक्रम

दरम्यान, शोएब मलिकने शनिवारी सकाळीच त्याच्या लग्नाचा फोटो शेअर केला होता. दुपारी तो बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसला. येथे त्याने फॉर्च्युन बारीशाल संघासाठी उपयुक्त योगदान दिले. याशिवाय त्याने टी-20 क्रिकेटमध्येही मोठे पराक्रम गाजवले. या सामन्यापूर्वी त्याच्या नावावर 12993 टी-20 धावा होत्या. या सामन्यात 17 नाबाद धावा करत त्याने 13 हजार टी-20 धावांचा आकडा पार केला. 13 हजार धावा करणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरला. त्याच्याआधी फक्त ख्रिस गेलने ही कामगिरी केली आहे.

T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

ख्रिस गेल- 14562 धावा

शोएब मलिक- 13010 धावा

किरॉन पोलार्ड- 12454 धावा

विराट कोहली- 11994 धावा

अॅलेक्स हेल्स- 11807 धावा

डेव्हिड वॉर्नर- 11745 धावा

ॲरोन फिंच- 11458 धावा

रोहित शर्मा- 11156 धावा

तिसऱ्या लग्नानंतर शोएब चर्चेत आहे

शोएब मलिकने सना जावेदसोबत तिसरे लग्न केले आहे. यापूर्वी, त्याने आयशा सिद्दीकी आणि सानिया मिर्झासोबत लग्न केले होते. त्याने 2010 मध्ये आयशाला घटस्फोट दिला आणि सानिया मिर्झाशी लग्न केले. आता तो सानियापासूनही वेगळा झाला आहे. याआगोदरच सानियाने शोएबपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. तर गेल्या दीड वर्षांपासून त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या येत होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT