Shoaib Akhtar Dainik Gomantak
क्रीडा

ENG vs PAK: पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तर म्हणाला...

Shoaib Akhtar on Pakistan Team: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने असे वक्तव्य केले की जे ऐकून तुम्ही थक्क व्हाल.

दैनिक गोमन्तक

 टी-20 वर्ल्ड कप 2022  च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध (Pakistan-England) पराभवाला सामोरे जावे लागले. दोन्ही संघांमधील हा सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला गेला. पाकिस्तानच्या या पराभवानंतर अनेक दिग्गजांची वक्तव्ये समोर येत आहेत. दरम्यान, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) असे वक्तव्य केले की, जे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

  • आता भारतातच विश्वचषक जिंकणार'' - शोएब अख्तर

पाकिस्तानसाठी यावेळी ही स्पर्धा चढ-उतारांनी भरलेली होती. सुरुवातीच्या सामन्यांमध्येही संघाला टीकेला सामोरे जावे लागले, मात्र संघ अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी ठरला. या पराभवानंतर शोएब अख्तरही निराश दिसला. त्याने सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ शेअर करून या पराभवावर आपले म्हणणे मांडले. 'हा विश्वचषक पाकिस्तान हरला असला तरी भारतातच विश्वचषक जिंकेल, असा विश्वास अख्तर यांना आहे. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाबाबत त्याने हे सांगितले आहे.

शोएब अख्तरने त्याच्या ट्विटरवर (Twitter) पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये पाकिस्तानी खेळाडूंबाबत म्हटले की, 'तुम्ही खूप चांगले काम केले आहे. तुम्ही स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या जवळ होता, पण तरीही अंतिम सामना खेळला. संपूर्ण विश्वचषकात (World Cup) पाकिस्तानच्या गोलंदाजीने चांगली कामगिरी केली. पाकिस्तानने चांगला खेळ केला, तो विश्वचषक जिंकण्यास पात्र होता. शाहीनची दुखापत हा टर्निंग पॉइंट होता, पण तो ठीक आहे. आता इथून स्वतःला खाली पडू द्यायचं नाही.

  • मी निराश आणि दुखावलो आहे - अख्तर

शोएब अख्तरने या व्हिडीओमध्ये पुढे म्हटले आहे की, 'जसे बेन स्टोक्सने T20 वर्ल्ड कप 2016 मध्ये षटकार ठोकले आणि त्याच्यामुळेच इंग्लंड मॅच हरली. मात्र आज टीम वर्ल्ड कप जिंकून त्यांची सुटका झाली. पाकिस्तान टीम, मी तुमच्या पाठीशी उभा आहे. काळजी करण्याची गरज नाही. मी निराश आणि दुखावलो आहे, पण ठीक आहे. आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. आता आपण भारतात विश्वचषक जिंकू...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT