Shoaib Akhtar Dainik Gomantak
क्रीडा

Shoaib Akhtar Video: शोएब अख्तरने, मक्काच्या क्लॉक टॉवरवरून शेअर केले पवित्र 'खाना काबा' चे सुंदर दृश्य

शोएब अख्तर पवित्र धार्मिक यात्रेत तो सौदी अरेबियाचे 'स्टेट गेस्ट' म्हणून सहभागी झाला आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) सध्या हज यात्रेवर आहे. या पवित्र धार्मिक यात्रेत तो सौदी अरेबियाचे 'स्टेट गेस्ट' म्हणून सहभागी झाला आहे. हा दिग्गज खेळाडू शनिवारी पाकिस्तानहून सौदी अरेबियाला रवाना झाला. सौदीच्या मक्का शहरात पोहोचल्यानंतर त्यांने येथील प्रसिद्ध मक्का क्लॉक टॉवरवरून 'खाना काबा'चे सुदंर दृश्य शेअर केला आहे. (Shoaib Akhtar Video News)

शोएब (Shoaib Akhtar) त्याच्या हज यात्रेसाठी खूप उत्सुक दिसत आहे. तो त्याच्या प्रवासातील प्रत्येक क्षणाचे अपडेट्स सोशल मिडीयावर (Social Media) शेअर करत आहे. मक्का क्लॉक टॉवरच्या माथ्यावर पोहोचल्यावर त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने लगेचच एका व्हिडिओद्वारे (Video) या टॉवरवरून 'खाना काबा'चे दृश्य दाखवले. शोएबने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर केला आहे.

हज यात्रेला (Hajj) रवाना होण्यापूर्वीच शोएबने त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यांने लिहिले होते, 'मी सौदी अरेबियाचा राज्य पाहुणा म्हणून पवित्र हजला जात आहे. मुस्लीम देशांच्या नेत्यांसोबत मी मक्का येथे हज परिषदेला संबोधित करणार आहे. या सगळ्यासाठी मी सौदी अरेबियाच्या पाकिस्तान दूतावासाचा आभारी आहे.

2019 मध्ये सुमारे 25 लाख लोकांनी हज यात्रा केली. पण 2020 मध्ये, कोरोणामुळे सौदी अथॉरिटी ने परंपरेच्या नावाखाली केवळ 1000 भाविकांना या धार्मिक यात्रेसाठी परवानगी दिली. यानंतर गेल्या वर्षी लॉटरीअंतर्गत 60 हजार लोकांची येथे प्रवास करण्यासाठी निवड करण्यात आली होती. तर यावर्षी सुमारे दहा लाख लोक हज करतील असा अंदाज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT