Shivam Dube X/BCCI
क्रीडा

IND vs AFG: 6,6,6...शिवम दुबेचा रुद्रावतार! नबीविरुद्ध ठोकले सलग तीन गगनचुंबी षटकार, Video Viral

Shivam Dube: अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू शिवम दुबेने सलग तीन षटकार मारल्याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

Pranali Kodre

Shivam Dube hit Three consecutive Sixes during India vs Afghanistan 2nd T20I at Indore:

भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात टी20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी (14 जानेवारी) पार पडला. या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला असून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी देखील घेतली आहे. भारताच्या या विजयात अष्टपैलू क्रिकेटपटू शिवम दुबेने आक्रमक खेळ करताना मोलाचा वाटा उचलला.

या सामन्यात अफगाणिस्तानने दिलेल्या 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांनी तुफानी अर्धशतके करताना 92 धावांची भागीदारी केली.

याचदरम्यान दुबेने 10 व्या षटकात मोहम्मद नबीविरुद्ध सलग तीन षटकारही खेचले. त्याने या षटकाच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर षटकार मारले. त्याच्या षटकारांचा व्हिडिओ बीसीसीआयनेही सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या सामन्यात दुबेने 32 चेंडूत 63 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याच्याशिवाय यशस्वी जयस्वालने 34 चेंडूत 68 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 6 षटकार मारले. तसेच विराट कोहलीने 29 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने १७३ धावांचे आव्हान 15.4 षटकात सहज पूर्ण केले.

अफगाणिस्तानकडून करिम जनातने 2 विकेट्ल घेतल्या, तर नवीन-उल-हक आणि फझलहक फारुकी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या अफगाणिस्तानकडून गुलबदिन नायबने 35 चेंडूत सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. तसेच नजिबुल्लाह झद्रान (23), करिम जनात (20) आणि मुजीब उर रेहमान (21) यांनी छोटेखानी पण आक्रमक खेळी केल्या. अफगाणिस्तानचा संघ 20 षटकात 172 धावांवर सर्वबाद झाला.

भारताकडून गोलंदाजी करताना अर्शदीपने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तसेच रवी बिश्नोई आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर शिवम दुबेने एक विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT