Shivam Dube  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: CSK च्या 'या' धाकडने राजस्थानविरुद्ध केला मोठा पराक्रम, नावावर झाला शानदार रेकॉर्ड!

IPL 2023: आयपीएल 2023 च्या 37 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा 32 धावांनी पराभव केला.

Manish Jadhav

IPL 2023: आयपीएल 2023 च्या 37 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा 32 धावांनी पराभव केला. चालू हंगामात राजस्थान रॉयल्सने दुसऱ्यांदा चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला आहे.

यापूर्वी चेन्नईचा तीन धावांनी पराभव झाला होता. पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 202 धावा केल्या.

याला प्रत्युत्तर देताना चेन्नई सुपर किंग्जचा संघ शिवम दुबेच्या अर्धशतकी खेळीमुळे 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 170 धावा करु शकला.

दरम्यान, शिवम दुबेने सीएसकेसाठी झंझावाती अर्धशतक ठोकले, पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. सामना गमावल्यानंतर त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

शिवम दुबेने शानदार रेकॉर्ड केला

शिवम दुबे आयपीएल 2023 मध्ये चांगली कामगिरी करत आहे. त्याने आयपीएल 2023 मध्ये CSK साठी 8 सामन्यात 235 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर तीन अर्धशतके आहेत. त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध अप्रतिम खेळी खेळली.

त्याने 33 चेंडूत 2 चौकार आणि चार लांब षटकारांसह 53 धावा केल्या. यासह त्याने टी-20 क्रिकेटमध्ये 100 षटकार पूर्ण केले.

जडेजा या खास क्लबमध्ये सामील झाला आहे

रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) आता 300 टी-20 सामने पूर्ण केले आहेत. विशेष म्हणजे, अशी कामगिरी करणारा तो 8 वा भारतीय खेळाडू ठरला आहे.

जडेजाने आतापर्यंत टी-20 क्रिकेटमध्ये 30.11 च्या सरासरीने 205 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने बॅटने 25.40 च्या सरासरीने 3,226 धावा केल्या आहेत. जडेजाने यापैकी सीएसकेसाठी 150 सामने खेळले आहेत.

राजस्थान रॉयल्सने बाजी मारली

राजस्थानने चेन्नई सुपर किंग्जला विजयासाठी 203 धावांचे लक्ष्य दिले होते. राजस्थानकडून यशस्वी जैस्वालने 77 आणि जोस बटलरने 27 धावा केल्या.

याशिवाय, ध्रुव जुरेलने अखेरीस 34 धावा केल्या. मात्र सीएसकेकडून फक्त शिवम दुबेलाच मोठी खेळी खेळता आली. त्याने शानदार अर्धशतक झळकावले. मात्र, सीएसकेचे उर्वरित फलंदाज धावा काढण्यासाठी संघर्ष करताना दिसले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT