Shikhar Dhawan Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022: गब्बरने केला खास रेकॉर्ड !

आयपीएल 2022 (IPL 2022) च्या शेवटच्या साखळी सामन्यात पंजाब किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा पाच गडी राखून पराभव केला.

दैनिक गोमन्तक

आयपीएल 2022 च्या शेवटच्या साखळी सामन्यात पंजाब किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा पाच गडी राखून पराभव केला. यासह या स्पर्धेतील दोन्ही संघाचा प्रवास संपुष्टात आला. हे दोन्ही संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले होते. त्यामुळे या सामन्याला विशेष महत्त्व नव्हते, परंतु पंजाब किंग्जचा सलामीवीर शिखर धवनने महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. या सामन्यात धवनने आयपीएलमधील 700 चौकार पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. (Shikhar Dhawan has become the first batsman to hit 700 fours in the IPL)

दरम्यान, आयपीएलमध्ये (IPL) सर्वाधिक चौकार मारण्याच्या बाबतीत धवनच्या खालोखाल विराट कोहली आहे, ज्याने 576 चौकार मारले आहेत. त्याचबरोबर या यादीत डेव्हिड वॉर्नर (David Warner) तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 561 चौकार मारले आहेत.

हैदराबादविरुद्ध 39 धावा

धवनने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (Sunrisers Hyderabad) 32 चेंडूत 39 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून दोन षटकार आणि दोन चौकार आले. शिखर धवनने आपल्या डावातील पहिले चार चौकार मारताच एक खास विक्रम केला. आयपीएलमध्ये 700 चौकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरला. धवनने 206 सामन्यांच्या 205 डावांमध्ये 35.08 च्या सरासरीने 6244 धावा केल्या आहेत. या लीगमध्ये त्याचा स्ट्राईक रेट 126.35 आहे. त्याच्या नावावर दोन शतके आणि 47 अर्धशतके आहेत. दरम्यान, त्याच्या बॅटने 701 चौकार आणि 136 षटकार मारले आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत धवन दुसऱ्या क्रमांकावर

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत शिखर धवन विराट कोहलीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने 6592 धावा केल्या आहेत, तर धवनने 6244 धावा केल्या आहेत. या दोघांशिवाय तिसऱ्या कोणत्याही फलंदाजाने आयपीएलमध्ये 6000 धावांचा टप्पा गाठलेला नाही. मात्र, रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नर पुढील हंगामात आयपीएलमध्ये 6000 धावा पूर्ण करु शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: कशाला घाई केली मित्रा...! Shubman Gill चा स्वतःच्या पायावर धोंडा, भडकला गौतम गंभीर; टीम इंडिया अडचणीत

Goa Assembly: आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेवरुन आलेमाव बरसले, 'सत्तरी' पॅटर्नवर उपस्थित केले सवाल; वाचा दिवसभरातील घडामोडी

IND vs ENG: इंग्लंडमध्ये केएल राहुलचा जलवा, करिअरमध्ये पहिल्यांदाच नोंदवले 'हे' 3 मोठे रेकॉर्ड; लवकरच गावस्करांनाही सोडणार मागे!

महात्मा गांधी म्हणाले होते 'दारु सोडा', अवैध मद्य तस्करीवरुन विजय सरदेसाईंनी दिले PM मोदींच्या गुजरातचे उदाहरण

Viral Video: आजीबाईचा 'स्वॅग'च निराळा! सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय तूफान व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT