Shikhar Dhavan  Twitter
क्रीडा

टीम इंडियाचा गब्बर मुलाला भेटून झाला भावूक, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

धवनने त्याचा मुलगा जोरावरसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय संघाचा सलामीवीर आणि IPL मधील पंजाब किंग्जचा स्टार खेळाडू शिखर धवन (Shikhar Dhawan) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तो अनेकदा सहकारी खेळाडूंसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतो. या मजेदार व्हिडिओंवर चाहतेही त्यांच्यावर प्रेमाचा कमेंट्सचा वर्षाव करतात.

अलीकडेच धवनने त्याचा मुलगा जोरावरसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. धवनने या फोटोसोबत भावनिक कॅप्शनही लिहिले आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये धवनने लिहिले की, तूला पुन्हा पाहून खूप आनंद झाला. धवनचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडिया यूजर्स धवनच्या मुलाला ज्युनियर गब्बर म्हणत आहेत. त्याचबरोबर अनेक यूजर्स या फोटोमध्ये दिसत असलेल्या बाप लेकाचे कौतुकही करत आहेत.

IPL 2022 मधील कामगिरी

IPL 2022 च्या मेगा लिलावात पंजाब किंग्जने शिखर धवनला 8 कोटी 25 लाख रुपयांची खरेदी केले. याआधी धवन दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता, पण एज फॅक्टरमुळे डीसीने त्याला सोडले. IPL 2022 च्या 14 सामन्यांमध्ये धवनने 38.33 च्या सरासरीने आणि 122.66 च्या स्ट्राइक रेटने 460 धावा केल्या. यादरम्यान त्याने 3 अर्धशतकेही झळकावली.

एकदिवसीय संघात स्थान मिळू शकते

शिखर धवनला T20 संघात जागा मिळाली नसली तरी तो ODI संघात स्थान मिळवू शकतो. टीम इंडियाला पुढील महिन्यात इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेळायची आहे. याशिवाय जुलैमध्ये संघाला वेस्ट इंडिज दौऱ्यावर 3 वनडे सामने खेळायचे आहेत. पुढील वर्षी एकदिवसीय विश्वचषक भारतातच होणार आहे. अशा स्थितीत धवन संघासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. त्याने 149 एकदिवसीय सामन्यांमध्ये 46 च्या सरासरीने 6284 धावा केल्या आहेत. त्याने 17 शतके आणि 35 अर्धशतके केली आहेत. स्ट्राइक रेट 93 आहे.

त्याने टीम इंडियासाठी 34 कसोटी आणि 68 टी-20 सामनेही खेळले आहेत. कसोटीत त्याने 41 च्या सरासरीने 2315 धावा केल्या आहेत. त्याने 7 शतके आणि 5 अर्धशतके केली आहेत. त्याचबरोबर टी-20 मध्ये 28 च्या सरासरीने 1759 धावा केल्या आहेत. 11 अर्धशतके केली आहेत. स्ट्राइक रेट 126 आहे. धवनच्या टी-20 मधील स्ट्राईक रेटवर नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT