त्याची तुलना सचिनसोबत करू नका, अर्जुन तेंडुलकरबाबत कपिल देव यांचे मोठे वक्तव्य

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला IPL-2022 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.
Arjun Tendulkar and Kapil Dev
Arjun Tendulkar and Kapil DevDainik Gomantak
Published on
Updated on

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला इंडियन प्रीमियर लीग-2022 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. अर्जुनला मुंबई इंडियन्सने 30 लाख रुपयांना खरेदी केले होते, या मोसमात तो पदार्पण करेल अशी अपेक्षा होती पण तसे होऊ शकले नाही. आता विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव यांनी 22 वर्षीय अर्जुनबाबत मोठे वक्तव्य केले आहे. (Arjun Tendulkar)

कपिल देव म्हणतात की, 'अर्जुनवर त्याच्या आडनावामुळे थोडा अधिक दबाव असेल, परंतु त्याला स्वतःचा खेळ खेळावा लागेल. प्रत्येकजण त्यांच्याबद्दल का बोलत आहे? कारण तो सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे. पण त्याला त्याचे क्रिकेट खेळू द्या आणि त्याची तुलना सचिन तेंडुलकरशी करू नका. तेंडुलकर आडनाव असणे अर्जुनसाठी फायदेशीर आणि नुकसान दोन्ही आहे. डॉन ब्रॅडमन यांच्या मुलानेही दबाव सहन न झाल्याने त्याचे नाव बदलले. अर्जुनवर जास्त दबाव टाकू नका, तो खूप तरुण आहे.'

Arjun Tendulkar and Kapil Dev
Birthday Special: तुरुंगात जाऊन आलेल्या 'बॅड बॉय'ने इंग्लंडला बनवले वर्ल्ड चॅम्पियन

"ने त्याच्या खेळाचा आनंद घ्यावा. त्याला कोणाला काही सिद्ध करण्याची गरज नाही, त्याच्या नावासोबत सचिन जोडला गेला आहे, त्यामुळे अर्जुनकडून खूप अपेक्षा आहेत. तेव्हा त्याने हा विचार न करता आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करावे,' असा सल्ला कपील देव यांनी अर्जुनला दिला.

Arjun Tendulkar and Kapil Dev
Video: मी कधीच टीम इंडियातून बाहेर पडलो नाही; हार्दिक पांड्या

या मोसमात मुंबई इंडियन्सने अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. अशा परिस्थितीत यावेळी अर्जुन तेंडुलकरही पदार्पण करेल, अशी आशा होती, मात्र तसे होऊ शकले नाही. अर्जुन तेंडुलकर गेल्या दोन हंगामांपासून मुंबई इंडियन्ससोबत आहे आणि तो त्याच्या संधीची वाट पाहत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com