Shikhar Dhawan Dainik Gomantak
क्रीडा

T20 क्रिकेटमध्ये 1000 चौकार मारणारा शिखर धवन पहिला भारतीय फलंदाज

T20 क्रिकेटमध्ये 1000 चौकार पूर्ण करणारा धवन हा जगातील चौथा फलंदाज आहे.

दैनिक गोमन्तक

पंजाब किंग्जचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने टी-20 क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. शुक्रवारी पंजाबचा सामना गुजरात टायटन्सशी झाला. या सामन्यात धवनने तिसरा चौकार मारताच नवीन विक्रम झाला. T20 क्रिकेटमध्ये 1000 चौकार मारणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. (Shikhar Dhawan becomes first Indian batsman to hit 1000 boundaries in t-20 cricket)

T20 क्रिकेटमध्ये 1000 चौकार पूर्ण करणारा धवन हा जगातील चौथा फलंदाज आहे. त्याच्या आधी ख्रिस गेल, अ‍ॅलेक्स हेल्स, डेव्हिड वॉर्नर आणि अ‍ॅरॉन फिंच यांनी ही कामगिरी केली आहे.

गुजरातविरुद्धच्या सामन्यात धवनने 30 चेंडूत 35 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने चार चौकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट 116.67 होता. धवनच्या नावावर आता टी-20 क्रिकेटमध्ये (Cricket) 1001 चौकार आहेत. T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याबाबत बोलायचे झाले तर ख्रिस गेल पहिल्या स्थानावर आहे. त्याच्या नावावर 463 सामन्यात 1132 चौकार आहेत. इंग्लंडचा अ‍ॅलेक्स हेल्स दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 336 सामन्यात 1054 चौकार मारले आहेत. डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या (Australia) या स्फोटक सलामीवीराने 314 सामन्यांमध्ये 1005 चौकार मारले आहेत. त्याचा सहकारी अ‍ॅरॉन फिंचने 348 सामन्यांत 1004 चौकार मारले आहेत.

विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर टी-20 क्रिकेटमध्ये 917 चौकार आहेत. विराटने 329 सामने खेळले आहेत. त्याच्यानंतर रोहित शर्माचे नाव येते. रोहितने 373 सामन्यात 875 चौकार मारले आहेत. आयपीएलच्या चालू हंगामातील पहिल्या तीन सामन्यांत धवनने एकही अर्धशतक केलेले नाही. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 43, कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध 16 आणि चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 33 धावा केल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT