रवी शास्त्रींचा मोठा दावा, हा खेळाडू रोहितला यंदाचा T20 विश्वचषक जिंकून देऊ शकतो!

आगामी काळात हा खेळाडू टीम इंडियासाठी चमत्कार दाखवताना दिसणार असल्याची कबुली शास्त्री यांनी दिली आहे.
Ravi Shastri News, IPL Cricket News
Ravi Shastri News, IPL Cricket News Dainik Gomantak
Published on
Updated on

Ravi Shastri : आयपीएल 2022 च्या पहिल्या 15 सामन्यांवरून अंदाज लावला जाऊ शकतो की यंदा लीग किती चांगली होत आहे. आतापर्यंतचे सर्व सामने अतिशय चुरशीचे झाले आहेत. विशेषत: यंदा युवा खेळाडूंच्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

दरम्यान, टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनीही आयपीएलमधील एका खेळाडूला पसंती दिली आहे. आगामी काळात हा खेळाडू टीम इंडियासाठी (Team India) चमत्कार दाखवताना दिसणार असल्याची कबुली शास्त्री यांनी दिली आहे. (Ravi Shastri's big claim, this player can help Rohit win this year's T20 World Cup!)

Ravi Shastri News, IPL Cricket News
ऐश्वर्या रायची मुलगी दिसली सीतेच्या अवतारात; आराध्या बच्चनचे जुने फोटो व्हायरल

शास्त्री या खेळाडूचे चाहते झाले

माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी युवा फलंदाज शुभमन गिल (Shubhaman Gill) हा जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम उदयोन्मुख फलंदाज असल्याचे म्हटले आहे. शास्त्री मानतात की गिल त्याच्या अफाट फटकेबाजीमुळे टी-20 फॉरमॅटसाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. आयपीएलच्या (IPL 2022) या मोसमात गिल गुजरात टायटन्सकडून खेळत आहे.

या 22 वर्षीय खेळाडूला या मोसमात चांगली कामगिरी करून ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषकात आपले स्थान निश्चित करायचे आहे. भारतीय संघाला विजेतेपद मिळवून देण्यात गिल उपयुक्त ठरू शकतो, असा विश्वासही शास्त्री यांना वाटतो.

स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यातील गिलच्या कामगिरीबद्दल बोलताना शास्त्री यांनी 'स्टार स्पोर्ट्स' क्रिकेट लाइव्हवर सांगितले, 'गिल हा देश आणि जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. जर तो असा खेळला तर तो मोठी धावसंख्या करू शकतो. तो फक्त खेळाच्या या फॉरमॅटसाठी बनवला गेला आहे. त्याचे शॉट सिलेक्शन आणि स्ट्राइक रोटेशन त्याला दबाव कमी करण्यास मदत करते.

शास्त्रीला गिलकडून आहेत खूप आशा

सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये गिलने आपल्या खेळाने प्रभावित केले आहे आणि येत्या आठवड्यात तो काही प्रभावी खेळी खेळेल अशी अपेक्षा आहे. शास्त्री म्हणाले, 'तो असा खेळाडू आहे जो खराब चेंडूला बाहेर पाठवण्यास सक्षम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com