Six Sixes In An Over By Indian Player: क्रिकेटच्या इतिहासात असे दोनच भारतीय खेळाडू आहेत, ज्यांनी सहा चेंडूत सहा षटकार ठोकून विक्रम केला आहे. असाच पराक्रम आणखी एका खेळाडून केला आहे.
या खेळाडूचे नाव क्वचितच कोणाला माहित असेल किंवा असे म्हणता येईल की या खेळाडूच्या या पराक्रमाबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल.
आम्ही येथे ज्या फलंदाजाबद्दल बोलत आहोत, तो सध्याच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे, शार्दुल ठाकूर, जो 'लॉर्ड' म्हणून ओळखला जातो.
शार्दुलनेही 6 चेंडूत 6 षटकार मारुन या रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव नोंदवले आहे. वास्तविक असे घडले की, वयाच्या 15 व्या वर्षी स्वामी विवेकानंद स्कूल आणि आर राधाकृष्णन स्कूल यांच्यातील सामन्यात त्याने 6 षटकार ठोकले होते. त्यावेळी तो दहावीत होता.
भारताचा माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री (Ravi Shastri) प्रथमच 6 चेंडूत 6 षटकार ठोकून अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. 1985 मध्ये बडोद्याविरुद्ध बॉम्बेकडून खेळताना शास्त्री यांनी डावखुरा फिरकी गोलंदाज तिलक राजला एका षटकात सहा षटकार ठोकले.
यानंतर 2007 मध्ये भारताचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 6 षटकार ठोकले होते.
भारतासाठी शार्दुल ठाकूरला आतापर्यंत 8 कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे, ज्यामध्ये त्याने 27 बळी घेत 254 धावा केल्या आहेत.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 35 सामने खेळताना 298 धावा केल्या, तर त्याच्या नावावर 50 विकेट आहेत. त्याचवेळी, टी-20 क्रिकेटमध्ये खेळल्या गेलेल्या 25 सामन्यांमध्ये त्याने 69 धावा केल्या आहेत आणि 33 विकेट्स घेतल्या आहेत.
सध्या तो आयपीएल (IPL) 2023 मध्ये केकेआरकडून खेळत आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत त्याने 82 सामन्यांत 282 धावा केल्या आहेत आणि 86 विकेट्सही घेतल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.