Shane Warne Dainik Gomantak
क्रीडा

Shane Warne Passes Away: 'या' महान स्पिनरला क्रिकेट जगतातील दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

जगातील महान लेग-स्पिनर आणि ऑस्ट्रेलियन दिग्गज क्रिकेटर शेन वॉर्नचे आज निधन झाले ((Shane Warne Passes Away) आहे.

दैनिक गोमन्तक

क्रिकेट जगतासाठी 4 मार्चचा दिवस वाईट बातमी घेऊन आला आहे. जगातील महान लेग-स्पिनर आणि ऑस्ट्रेलियन दिग्गज क्रिकेटर शेन वॉर्नचे आज निधन झाले ((Shane Warne Passes Away) आहे. शेन वॉर्नने वयाच्या 52 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. वॉर्नचे थायलंडमधील त्याच्या व्हिलामध्ये निधन झाले, जिथे तो मागील काही दिवसांपासून राहत होता. वॉर्नच्या मृत्यूने संपूर्ण क्रिकेट विश्व हादरले आहे. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशेस मालिकेत कॉमेंट्री करणाऱ्या शेन वॉर्नबद्दलच्या या बातमीने सगळेच अवाक झाले आहेत. शुक्रवारी सकाळपर्यंत वॉर्न सोशल मिडियावर सक्रीय होता. परंतु ह्रदयविकाच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. संपूर्ण क्रिकेट जगताने त्याला आदरांजली वाहिली आहे. (Shane Warne Passes Away cricketers comments tweets reaction)

दरम्यान, ऑस्ट्रेलियन चॅनल फॉक्स स्पोर्टने शेन वॉर्नच्या व्यवस्थापन कंपनीच्या हवाल्याने म्हटले आहे की, महान लेग-स्पिनर थायलंडमधील त्याच्या व्हिलामध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडला होता, परंतु डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही वॉर्न बरा होऊ शकला नाही. आणि आज अखेर त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला.

क्रिकेट जगताची स्थिती

जगातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक असलेल्या शेन वॉर्नच्या निधनाने क्रिकेट विश्व हादरले. ऑस्ट्रेलियासाठी 708 कसोटी बळी घेणारा हा महान लेगस्पिनर अचानक असा जगाचा निरोप घेऊन गेला यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. चाहत्यांपासून ते त्याच्या माजी सहकाऱ्यांपर्यंत आणि क्रिकेट संघातील प्रतिस्पर्ध्यांपर्यंत या चॅम्पियन श्रद्धांजली वाहिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT